रिक्षाचा मीटर आता तरी पडणार का ?
सातारा :
रिक्षा चालकांकडून मीटर न टाकता प्रवाश्यांकडून भाडे आकारण्यात येत आहे. हे भाडे मीटर नुसार नसल्याने प्रवाश्यांच्या खिशाला भुर्दड बसत आहे. गेल्या अनेक वर्षापासून साताऱ्यात रिक्षा चालकांकडून प्रवाशांची पिळवणूक करण्यात येत आहे. ही पिळवणूक थांबवत मीटर नुसार भाडे न आकारणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी जिल्हा ग्राहक संरक्षक परिषदेच्या बैठकीत दिले. या आदेशाचे पालन परिवहन विभागाकडून होणार का ? अशी उलट सुलट चर्चा सुरू आहेत.
खाजगी वाहनांची संख्या वाढल्याने रिक्षा ने प्रवास कमी झाला आहे. रिश्नांची संख्या जास्त आणि प्रवाशी कमी अशी अवस्था सर्वत्र पहायला मिळा आहे. प्रवाशी नसल्याने रिनाचा धंदाही होत नाही. यात बाढत्या पेट्रोल दराने भर टाकल्याने मीटर प्रमाणे पैसे घेणे आता रिक्षा चालकांना परवडत नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे गेल्या अनेक वर्षापासून मीटर आडवा न करता चालकांकडून मनमानी भाडे आकारण्यात येत आहे. हा मनमानी वर जवळपास ८० ते १५० च्या घरात गेला आहे. शहराच्या तुलनेत ग्रामीण भागातील प्रवाश्यांच्या खिशाला भुर्दंड बसवेल असाच आहे. मीटर न टाकता भाडे आकारणे ही पिळवणूक असून ती थांबली पाहिजे. अशी मागणी नेहमी होत असते. परंतु प्रादेशिक परिवहन विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. याचा फायदा रिक्षा चालकांनी घेतला आहे.
याबाबत सातारा शहरात रिक्षाचे अवाजवी दर आकारणीबाबत ग्राहक संरक्षक परिषदेच्या सदस्यांनी मुद्दा उपस्थित केला. यावर बोलताना जिल्हाधिकारी संतोष पाटील म्हणाले, प्रादेशिक परिवहन विभागाने यावर कार्यवाही करावी. दर आकारणी मीटरप्रमाणे व्हावी यासाठी प्रवासी संघटना, रिक्षा चालक संघटना यांना एकत्रित घेऊन मार्ग काढावा.
- आदेशाचे होणार का पालन
रिक्षा चालक गेल्या अनेक वर्षापासून मीटर न टाकता भाडे आकारत आहेत. ही बाय प्रादेशिक परिवहन विभागाच्या आधी लक्षात आली नाही का? फक्त सदस्यांनी प्रश्न उपस्थित करताच पुन्हा हा मुद्दा चर्चेचा विषय बनला आहे. जिल्हाधिकारी पाटील यांनीही कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांच्या या आदेशाचे पालन परिवहन विभाग करणार का? अशी चर्चा सुरू असून कारवाईला कोणत्या वर्षी सुरुवात होणार असा ही प्रश्न उपस्थित केला जात आहे.
- प्रशासनाने एकच बाजू अधु नये
खाजगीच नव्हे तर सर्वच प्रवाशी वाहनांची संख्या वाढत आहे. यामुळे रिक्षा चालकांना प्रवासी मिळत नाहीत. सीटावर रिक्षाचा धंदा सुरू आहे. यातून पेट्रोल खर्च, उदरनिर्वाह चालवावा लागत आहे. दुसरे कोणतेही आर्थिक उत्पन्न नसल्याने रिक्षा चालकांचीही बिकट अवस्था झाली आहे. याबाबत प्रशासनाने विचार करावा. फक्त रिक्षा चालकांनाच नव्हे तर सर्वच प्रवासी वाहनांना नियम लागू करावेत. अशी मागणी करत आहेत.
विष्णु जांभळे, जिल्हाध्यक्ष रिक्षा चालक संघटना