ज्येष्ठ नागरिकांची रेल्वे तिकीट सवलत पूर्ववत होणार काय ?
01:21 PM Dec 09, 2024 IST | Pooja Marathe
Advertisement
ज्येष्ठ नागरीक चार वर्षापासून या सवलतीपासून वंचित
अर्थ संकल्पात विचार होणे गरजेचे
कोल्हापूर
कोविड 19 महामारीमुळे देशातील सर्व रेल्वे सेवा कांही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. या पूर्वी ज्येष्ठ नागरिकासाठी रेल्वे तिकिटामध्ये सवलत दिली जात होती. रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होऊन, चार वर्षे होऊन देखील, ज्येष्ठ नागरिकासाठी मिळणारी , रेल्वे तिकिटाची सवलत अजूनही बंद आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ही सवलत, ज्येष्ठ नागरिकांना पूर्ववत सुरू होणार काय ? अशी प्रतिक्षा ज्येष्ठ नागरिकाकडून होत आहे.
अर्थ संकल्पात विचार होणे गरजेचे
कोल्हापूर
कोविड 19 महामारीमुळे देशातील सर्व रेल्वे सेवा कांही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. या पूर्वी ज्येष्ठ नागरिकासाठी रेल्वे तिकिटामध्ये सवलत दिली जात होती. रेल्वे सेवा पूर्ववत सुरू होऊन, चार वर्षे होऊन देखील, ज्येष्ठ नागरिकासाठी मिळणारी , रेल्वे तिकिटाची सवलत अजूनही बंद आहे. मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात ही सवलत, ज्येष्ठ नागरिकांना पूर्ववत सुरू होणार काय ? अशी प्रतिक्षा ज्येष्ठ नागरिकाकडून होत आहे.
ज्या पुरूषाचे वय 60 वषें पूर्ण आहे त्यांना 40 टक्के, तर ज्या महीलांचे वय 58 वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यांना रेल्वे तिकिटामध्ये 50 टक्के सवलत रेल्वे विभागाकडून दिली जात होती. यामध्ये सर्व ट्रेनमधील स्लिपर, टू टायर ,एसी, एसी चेअर या विविध श्रेणीच्या वर्गाचा समावेश होता. यामध्ये सामान्य, महिला व तात्काळ कोटयामध्ये ज्येष्ठ नागरिकांचा समावेश होता. कोरोनानंतर रेल्वेबरोबर ही सवलत ही बंद झाली. कोरोनानंतर जून 2022 नंतर देशातील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली. पण ज्येष्ठ नागरिकांची ही तिकीट सवलत सुरू झालेली नाही. गेल्या चार वर्षांपासून ही मागणी प्रलंबित आहे. राज्य सरकारने महीलासाठी तसेच 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरीकासाठी एसटीने तिकीटाची सवलत सुरू केली असताना, रेल्वे प्रशासनाकडून अजूनही सवलतीचा ग्रीन सिग्नल मिळालेला नाही. याबाबत ज्येष्ठ नागरीक सवलतीच्या प्रतिक्षेत आहेत.
कोरोनानंतर जून 2022 नंतर देशातील रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली. पण ही सवलत सुरू करण्यासाठी, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे खासदार, रेल्वे संघटना, ज्येष्ठ नागरीक संघटना यांनी निवेदनाव्दारे मागणी केली आहे. ही सवलत बंद झाल्याने, रेल्वे प्रशासनाचा फायदा 5800 कोटीचा तसेच वाहतूक सेवेव्दारे मोठे उत्पन्न मिळाले असल्याचे सांगण्यात येते. तरी देखील या सवलतीचा विचार झालेला नाही. भारतीय रेल्वे नेटवर्क हे आशियातील सर्वात मोठे असून, जगातील दुसऱ्या क्रमकांची सेवा असल्याचे सांगण्यात येत आहे.
रेल्वे तिकीटाची सवलत पुढील कांही वर्गाला दिली जात आहे. यामध्ये दिव्यांग, पूर्णं दृष्टीहीन, अपंग, श्रवणदोष, रूग्ण, विद्यार्थी व सहकारींचा समावेश आहे. त्यांना 25 ते 75 टक्के रेल्वे तिकीटावर सवलत दिली जात आहे. फेब्रुवारीमध्ये केद्रींय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या केंद्रीय अर्थंसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या रेल्वे तिकीट सवलतीचा विचार होणे गरजेचे आहे.
Advertisement
ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकीट सवलत पूर्ववत सुरू व्हावी
कोरोनानंतर रेल्वे प्रशासनाकडून ज्येष्ठ नागरीकांना मिळणारी रेल्वे तिकीट सवलत बंद करण्यात आली आहे. गेले चार वर्षांपासून हे ज्येष्ठ नागरीक या सवलतीपासून वंचित आहेत. यासाठी रेल्वे प्रवास संघटना ,लोकप्रतिनिधी व प्रशासनाच्या समितीमध्ये याची वारंवार मागणी करण्यात आली आहे.
-शिवनाथ बियाणी, सल्लागार सदस्य , पूणे रेल्वे विभाग
Advertisement