For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राज्यात 44 लाख मतदारांची नावे वगळणार?

06:47 AM Jul 23, 2026 IST | Tarun Bharat Portal
राज्यात 44 लाख मतदारांची नावे वगळणार
Advertisement

पत्ता न बदलणे, मृत यासह इतर कारणे : विसंगती आढळल्यास आयोगाला कळविण्याचे आवाहन

Advertisement

त. भा. प्रतिनिधी

बेंगळूर :

Advertisement

सुमारे 44.84 लाख मतदारांनी आपले निवासस्थान बदलले तरी मतदार यादीत आपला पत्ता बदलला नाही. अशा मतदारांना ‘अज्ञात मतदार’ किंवा ‘कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार’, दुबार नोंद असलेले, मृत आणि इतर (एएसडीडीओ) या वर्गात समाविष्ट करण्यात आले आहे, असे कर्नाटकचे मुख्य निवडणूक अधिकारी (सीईओ) व्ही. अन्बू कुमार यांनी सांगितले. राजकीय पक्ष आणि मतदारांना ही यादी तपासून काही विसंगती आढळल्यास आयोगाला कळविण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

बुधवारी बेंगळूरमध्ये पत्रकार परिषदेत बोलताना अन्बू कुमार म्हणाले, एएसडीडीओ  यादीमध्ये 5,87,457 अनुपस्थित, 26,32,229 कायमस्वरूपी स्थलांतरित, 9,81,642 मृत, 2,70,659 इतरत्र नोंदणी केलेले आणि 12,344 इतर मतदारांचा समावेश आहे, यात प्रामुख्याने स्वाक्षरी करण्यास नकार देणाऱ्यांचा समावेश आहे. ही एकूण संख्या 44,84,331 मतदारा  इतकी आहे, असे ते म्हणाले.

राज्यभरातील मान्यताप्राप्त राजकीय पक्षांनी नियुक्त केलेल्या बूथ लेव्हल एजंट्सना (बीएलए) एएसडीडीओ यादी देण्यात आली आहे. ही माहिती मतदारसंघनिहाय मतदान नोंदणी अधिकारी (ईआरओ), जिल्हानिहाय जिल्हा निवडणूक अधिकारी (डीईओ) आणि मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयामार्फत सर्व मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना कळविण्यात आली आहे, असे व्ही. अन्बुकुमार यांनी सांगितले.

ग्रेटर बेंगळूर प्राधिकरण क्षेत्रांतर्गत, एएसडीडीओ वर्गात सुमारे 23,86,132 मतदारांची ओळख पटविण्यात आली आहे. राज्यातील 24 जिल्ह्यांमध्ये एसआयआर अर्ज वितरणाचे काम 100 टक्के पूर्ण झाले आहे. राज्यभरात केवळ 60,000 अर्ज वितरित करणे बाकी आहे. हे अर्जसुद्धा दोन-तीन दिवसांत वितरित केले जातील, असे त्यांनी सांगितले.

Advertisement
Tags :

.