For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

विधानसभेचे 40 ऐवजी 50 मतदारसंघ होणार?

01:18 PM Apr 16, 2026 IST | Tarun Bharat Portal
विधानसभेचे 40 ऐवजी 50 मतदारसंघ होणार
Advertisement

पणजी : मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये गोव्यासाठी लोकसभेच्या जागांमध्ये आणखी एकाने वाढ होऊ शकते. त्याचबरोबर विधानसभेमध्ये 40 ऐवजी 50 मतदारसंघ होतील, असा अंदाज आहे. केंद्र सरकार लवकरच पुनर्रचना आयोग स्थापन करणार आहे. यासाठी जनगणनेचा आधार घेतला जातो. केंद्राने सध्या तरी 2011 च्या जनगणनेचा आधार घेतलेला आहे, परंतु प्रत्यक्षात पुनर्रचनेची अंमलबजावणी लक्षात घेता भविष्यात गोव्यात 40 ऐवजी 50 मतदारसंघ होतील. पुनर्रचना आयोग आपले काम लवकरच सुरू करेल असा अंदाज आहे.

Advertisement

पुनर्रचनेची अंमलबजावणी

पुनर्रचना आयोगाने सादर केलेल्या अहवालाची प्रत्यक्षात अंमलबजावणी 2029 च्या लोकसभा निवडणुकीवेळी केली जाणार आहे. गोव्यात विधानसभा निवडणुका 2027 मध्ये सुऊवातीच्या दरम्यान होणार आहे. त्यामुळे पुनर्रचना आयोगाच्या शिफारसींची अंमलबजावणी गोव्यात 2032 मध्ये होईल. मात्र लोकसभेच्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेची अंमलबजावणी 2029 मध्ये होणार आहे. या दरम्यान गोव्यातील लोकसभा मतदारसंघामध्ये आणखी एका मतदारसंघाची भर पडेल असा अंदाज आहे.

Advertisement

लोकसभेसाठी तीन जागा

गोवा हे छोटे राज्य असून इथे केवळ 11 लाख मतदार आहेत. सध्या लोकसभेचे दोन मतदारसंघ आहेत. तरी देखील तिसरा कुशावती जिल्हा स्थापन झाल्यामुळे कदाचित गोव्यातील लोकसभा मतदारसंघांमध्ये आणखी एकाची वाढ अपेक्षित आहे.

एसटींना चार जागा मिळणार

विधानसभा मतदारसंघ पुनर्रचना करताना गोव्यात एसटी समाजाला चार जागा राखीव ठेवण्याचा प्रस्तावही येणार आहे आणि त्याची अंमलबजावणी 2032 च्या निवडणुकीमध्ये होईल. तोपर्यंत आदिवासी मंडळींना विधानसभेसाठी आरक्षण मिळणार नाही.

Advertisement
Tags :

.