For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Dada Bhuse on Private Schools | शाळेतूनच वह्या-पुस्तके खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई; विधानसभेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा इशारा!

04:57 PM Jul 02, 2026 IST | NEETA POTDAR
dada bhuse on private schools   शाळेतूनच वह्या पुस्तके खरेदीची सक्ती करणाऱ्या शाळांवर होणार कारवाई  विधानसभेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचा इशारा
Advertisement

मुंबई - राज्यात 15 जूनपासूनच शाळांना सुरुवात झाली असून आता नियमित शाळा सुरू झाल्याने पालक आणि विद्यार्थी देखील शालेय जीवनात रमल्याचे पाहायला मिळत आहे..मात्र, नव्या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीलाच खासगी शाळांकडून पालकांवर आर्थिक बोजा टाकल्याचा मुद्दा आता थेट विधानसभेत गाजल्याचा चित्र पाहायला मिळत आहे..  मात्र, बहुतांशी खासगी आणि स्वयंअर्थसहाय्य शाळांनी विद्यार्थ्यांना आपल्याच शाळेतून  पुस्तक, वह्या आणि शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधींनी सभागृहात मांडली. यावर आता शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले.

Advertisement

राज्यातील अनेक खासगी तसेच केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या संलग्न शाळाकडून विद्यार्थ्यांना विशिष्ट दुकानातून साहित्य खरेदी करण्याची सक्ती करत पालकांची लूट केली जात आहे. विद्यार्थ्यांसाठी खासगी शाळांमधून मोठ्या प्रमाणात वाढीव दराने वह्या पुस्तकांची विक्री करण्यात येत असून खासगी दुकानातून वह्या पुस्तकांच्या विक्रींच्या किंमतीत मोठी तफावत आहे. यावर शिक्षणमंत्री दादा भुसे म्हणा्ले की, कोणत्याही शाळेला पालकांवर शाळेतून  साहित्य खरेदी करण्याची सक्ती करण्याचा अधिकार नाही. अशा प्रकारच्या तक्रारी आल्यास शालेय शिक्षण विभागाकडून चौकशी करून संबंधित शाळांवर कारवाई करण्यात येईल. काही शाळांना यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्याची माहितीही त्यांनी सभागृहात यावेळी दिली.

दरम्यान, या प्रकारांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी शालेय शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी महत्त्वाची घोषणा केली. अशा तक्रारींवर लक्ष ठेवण्यासाठी आणि नियमांचे पालन होत आहे की नाही, यावर देखरेख करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

आता या समितीची स्थापना नेमकी कधी होणार, तिचे अधिकार काय असतील आणि पालकांच्या तक्रारींवर कितपत प्रभावी कारवाई होईल, याकडे राज्यभरातील लाखो पालकांचे लक्ष लागले आहे.

Advertisement
Tags :

.