For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

युगांडाविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार खेळणार?

06:14 AM May 27, 2026 IST | Tarun Bharat Portal
युगांडाविरुद्धच्या मालिकेत सूर्यकुमार खेळणार
Advertisement

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

Advertisement

युगांडाचा क्रिकेट संघ 30 मे रोजी मुंबईत दाखल होणार असून त्यांच्याविरुद्ध या दौऱ्यात टी-20 चार सामने आणि चार वनडे सामने खेळविले जाणार आहेत. भारताच्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव या मालिकेत खेळण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

युगांडा क्रिकेट संघाने अलिकडेच चार सामन्यांच्या वनडे मालिकेत एमसीई कोल्ट्स संघाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला होता. टी-20 मुंबई लिग सामन्यातील विविध चार संघांबरोबर युगांडाचे सामने 1 जूनपासून खेळविले जातील. या सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादव खेळणार असल्याची माहिती मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव उन्मेश खानविलकर यांनी दिली.

Advertisement

Advertisement
Tags :

.