For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Raju Shetti | जमीन देणार नाही; कितीही बळाचा वापर करा राजू शेट्टींचा सरकारला इशारा

02:22 PM Feb 20, 2026 IST | NEETA POTDAR
raju shetti   जमीन देणार नाही  कितीही बळाचा वापर करा राजू शेट्टींचा सरकारला इशारा
Advertisement

                         परभणी दैठण्यात शक्तीपीठ महामार्गासाठी जमीन मोजणीला शेतकऱ्यांचा जोरदार विरोध

Advertisement

परभणी -  परभणी जिल्ह्यातील दैठणा येथे प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गासाठी संयुक्त जमीन मोजणीला शेतकऱ्यांनी जोरदार विरोध दर्शवला. मोजणी प्रक्रियेदरम्यान आंदोलन करणाऱ्या काही शेतकरी व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळाली आहे. त्यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

या प्रकरणावर माजी खासदार राजू शेट्टी यांनी सत्ताधारी सरकारला थेट इशारा दिला आहे, की. “कितीही बळाचा वापर केला तरी शक्तीपीठ महामार्गाच्या जमीन मोजणीस विरोध होणारच. इंग्रजांसारखी जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्यास तो हाणून पाडू. एक इंचही जमीन देणार नाही,” असे ते म्हणाले. तसेच, “संपूर्ण शेतकरी वर्गाचा या महामार्गाला विरोध आहे. पोलिसांकडून करण्यात आलेल्या दडपशाहीचा आम्ही निषेध करतो. याची किंमत सरकारला मोजावी लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

Advertisement

Advertisement
Tags :

.