For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वानखेडेवर मुंबई हैदराबादची घोडदौड रोखणार ?

07:02 AM Apr 29, 2026 IST | Tarun Bharat Portal
वानखेडेवर मुंबई हैदराबादची घोडदौड रोखणार
Advertisement

सीएसकेविरुद्धच्या मोठ्या पराभवानंतर मुंबईला आव्हान टिकविण्यासाठी वेगाने पुनरागमन करण्याची गरज

Advertisement

वृत्तसंस्था 

मुंबई : आज बुधवारी येथे होणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या महत्त्वपूर्ण सामन्यात पाच वेळच्या विजेत्या मुंबई इंडियन्सचे स्पर्धेतील आव्हान पणाला लागलेले असेल. फॉर्मात असलेल्या सनरायझर्स हैदराबादविऊद्ध मुंबई इंडियन्सला आपल्या कामगिरीत मोठे परिवर्तन घडवून आणावे लागेल.

Advertisement

पहिल्या सात सामन्यांमध्ये पाच पराभव आणि त्यातील सर्वांत अलीकडील पराभव (चेन्नई सुपर किंग्सविऊद्ध 103 धावांनी) हा त्यांच्या इतिहासातील सर्वांत मोठा पराभव असल्याने मुंबई इंडियन्स (क्रमांक 9, 4 गुण, नेट रन रेट -0.736) भरपूर घसरला आहे. संघाच्या प्रमुख खेळाडूंच्या निराशाजनक कामगिरीमुळे ते मोठ्या अडचणीत सापडले आहेत.

भारताच्या टी-20 विश्वचषक विजेत्या संघातील तब्बल चार खेळाडूंचा समावेश असलेल्या मुंबई इंडियन्सच्या अडचणी कर्णधार हार्दिक पांड्या (3 बळी आणि 97 धावा) आणि सूर्यकुमार यादव (110 धावा) यांच्या सामान्य कामगिरीमुळे आणखी वाढल्या आहेत. गुजरात टायटन्सविऊद्ध तिलक वर्माच्या पहिल्या आयपीएल शतकामुळे मुंबई इंडियन्सला सलग चार सामन्यांतील पराभवाची मालिका खंडित करण्यास मदत झाली, पण चेन्नई सुपर किंग्सकडून झालेल्या मोठ्या पराभवामुळे त्यांची डळमळीत मोहीम पुन्हा एकदा रसातळाला गेली.

तसेच मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजीत जसप्रीत बुमराह (2 बळी) खूपच मागे पडला आहे. सहसा मधल्या षटकांमध्ये बळी मिळवण्यासाठी आणि अखेरच्या षटकांमध्ये प्रतिस्पर्धी संघाला रोखण्यासाठी राखीव ठेवल्या जाणाऱ्या बुमराहने इतर नवीन चेंडूने गोलंदाजी करणारे गोलंदाज अपयशी ठरल्यामुळे, गेल्या दोन सामन्यांमध्ये अनपेक्षितपणे मुंबई इंडियन्ससाठी गोलंदाजीची सुऊवात केली आहे. ट्रेंट बोल्ट (1 बळी) आणि दीपक चहर (1 बळी) या दोघांनीही भेदक गोलंदाजी केलेली नाही आणि एकूणच पाहता बळींची कमतरता आणि सामान्य गोलंदाजीमुळे मुंबईने पॉवरप्लेमध्ये अनेकदा प्रतिस्पर्धी संघांना सामन्यावर नियंत्रण मिळवू दिले आहे.

दरम्यान, रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे एक पोकळी निर्माण झाली आहे, जी दानिश मालेवार (2, 0) गेल्या दोन सामन्यांमध्ये भरून काढू शकलेला नाही आणि धोंडशिरेच्या दुखापतीनंतर हा माजी कर्णधार तंदुऊस्त झाला आहे की नाही हे पाहावे लागेल. त्याचप्रमाणे दुखापतग्रस्त मिचेल सँटनरच्या जागी केशव महाराजला संधी मिळाल्याने विल जॅक्सला अंतिम 11 खेळाडूंमध्ये स्थान मिळते की नाही हेही पाहावे लागेल.

दरम्यान, वानखेडे स्टेडियमच्या फलंदाजीसाठी अनुकूल खेळपट्टीवर उतरताना हैदराबाद मुंबईविऊद्धची सलग तीन सामन्यांतील पराभवाची मालिका संपवण्यासाठी सज्ज असेल. 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या आक्रमणामुळे दबून न न जाता हैदराबादने जोरदार खेळ करत राजस्थान रॉयल्सवर या हंगामातील दुसरा विजय नोंदवलेला असल्याने त्यांचा उत्साह वाढलेला असेल.

संघ: मुंबई इंडियन्स: हार्दिक पांड्या (कर्णधार), क्विंटन डी कॉक, रायन रिकल्टन, रॉबिन मिन्झ, दानिश मालेवार, शेरफेन रदरफोर्ड, रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, राज बावा, कॉर्बिन बॉश, विल जॅक्स, मयंक रावत, नमन धीर, शार्दुल ठाकूर, अश्वनी कुमार, जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट, दीपक चहर, क्रिश भगत, ए. एम. गझनफर, केशव महाराज, मयंक मार्कंडे, मोहम्मद इझहार, रघू शर्मा.

सनरायझर्स हैदराबाद : पॅट कमिन्स (कर्णधार), सलील अरोरा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, ट्रॅव्हिस हेड, रविचंद्रन अश्विन, अनिकेत वर्मा, अभिषेक शर्मा, हर्ष दुबे, क्रेन्स फुलेत्रा, लियाम लिव्हिंगस्टोन, कामिंदू मेंडिस, नितीश कुमार रे•ाr, हर्षल पटेल, शिवम मावी, शिवांग कुमार, अमित कुमार, जेराल्ड कोएत्झी, प्रफुल हिंगे, साकिब हुसेन, दिलशान मदुशंका, एशान मलिंगा, ओंकार तरनाळे, जयदेव उनाडकट, झीशान अन्सारी.

सामन्याची वेळ : सायंकाळी 7.30 वा.

Advertisement
Tags :

.