कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शहरातील मंडळांना नोटीसा देणार

11:31 AM May 07, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / सुधाकर काशीद : 

Advertisement

कोल्हापुरात एखादी मिरवणूक चाललेली असली तर त्यातील स्पीकरच्या दणदणाटाने 80 टक्के लोक कानात बोटे घालतात. किंवा कापसाचे बोळे घालतात. पण आता एखादी मिरवणूक चालली आणि त्या मिरवणुकीत रंगीबेरंगी प्रकाशाचे झोत असले तर लोकांना डोळे बंद करून किंवा मिरवणुकीकडे पाठ फिरवून उभे राहायची वेळ आली आहे. त्यामुळे अशी मिरवणूक म्हटलं, की लोक त्याकडे ‘कानाडोळा’ करू लागले आहेत. कान आणि डोळा ही महत्त्वाची इंद्रिये आहेत. आणि ठराविक मंडळांनी आपली ताकद दाखवण्यासाठी मिरवणुकीत आणलेल्या अशा साऊंड सिस्टीम आणि तीव्र प्रकाशझोतामुळे खबरदारी घ्यावीच लागत आहे.

Advertisement

कोल्हापुरात गेल्या महिनाभरात जयंती सोहळे साजरे झाले. राष्ट्रपुरुषांच्या जयंती सोहळयात त्यांच्या विचाराऐवजी दणकेबाज मिरवणुकांवर संयोजकांनी भर दिला. किंबहुना या मिरवणुकांनाच जयंती सोहळयाच्या निमित्ताने प्राधान्य दिले गेले. हे प्राधान्य देताना ‘त्याच्यापेक्षा आपली मिरवणूक मोठी’ या इर्षेच्या मुद्यावर अधिक भर देण्यात आला. त्यामुळे जयंती सोहळ्dयाचा 80 टक्के खर्च अशा मिरवणुकांवरच केला गेला. त्याचा फायदा शहरवासियांना काय झाला? शून्य झाला.

लोकांनी ज्या रस्त्यावर मिरवणूक आहे त्या रस्त्यावरून जाणे टाळले. अनेक जण ‘ट्रॅफिक जाम’मुळे एका जागी तास-तासभर अडकले. ज्या मार्गावरून मिरवणूक गेली, त्या मार्गावरच्या रहिवाशांनी दारे खिडक्या बंद केल्या. मिरवणुकीच्या रस्त्यावरचे व्यापारी दुकानदार अक्षरश: हातबल झाले. कारण गिऱ्हाईक येण्याची शक्यताच नाही, हे त्यांनी ओळखले. जे लोक मिरवणुकीच्यावेळी रस्त्यावर होते. त्यांनी कान बंद केले. मिरवणुकीतील प्रखर प्रकाशझोत डोळ्dयांवर पडू नयेत, म्हणून डोळे बंद करून घेतले. त्यामुळे या मिरवणुकीत फक्त नॉनस्टॉप नाचणारेच नाचत राहिले. आपली मिरवणूक पाहायला रस्त्यावर कोणी नाही. आजूबाजूच्या घरातील रहिवाशांनी दारे-खिडक्या कधीच बंद केल्या आहेत, हेच मिरवणुकीत नाचणारे विसरून गेले.

हौसेला मोल नसते, असे म्हणतात. तसाच प्रकार या मिरवणुकीत स्पीकरचा आवाज, रोषणाईचा झगमगाट यावर दिसून आला. जयंती सोहळ्dयाचा निम्म्याहून अधिक खर्च या दणदणाटावर आणि लखलखाटावर झाला. त्याचा लोकांना फायदा शून्य आहे. तोटाच खूप आहे आणि तो मंडळ सोडून इतरांना सहन करावा लागला आहे. ध्वनिमर्यादेच्या अटीमुळे ही मंडळे कारवाईस पात्र आहेत. पण ही कारवाई साठ दिवसानंतर होणार आहे. कारण अशा कारवाईची एक प्रोसिजर आहे आणि पोलीस त्या पद्धतीने कारवाई करणार आहेत.

१० मंडळे रडारवर

मिरवणुकीतील 10 मंडळांच्या ध्वनिमर्यादेचे ‘व्हॉईस सॅम्पल’ घेण्यात आले आहेत. आता पोलीस उपअधीक्षक या मंडळांना नोटीस काढतील. या नोटीसीला उत्तर देण्याची मुदत 60 दिवसांची आहे. त्यानंतर जी मंडळे कारवाईस पात्र राहतील त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जातील.

                                                                                                                   - संजीव झाडे, पोलीस निरीक्षक, जुना राजवाडा.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article