तामिळनाडू सरकारच्या याचिकेवर सुनावणी करणार
सर्वोच्च न्यायालय उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यास नकार
वृत्तसंस्था
नवी दिल्ली
सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी तामिळनाडू सरकारच्या तिरुप्परनकुंद्रम पर्वतावर दीप प्रज्ज्वलित करण्याची अनुमती देणाऱ्या मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या याचिकेवर सुनावणी करण्याची तयारी दर्शविली आहे. न्यायाधीश अरविंद कुमार आणि विपुल पंचोली यांच्या खंडपीठाने मूळ याचिकाकर्ते रमा रविकुमार आणि इतर जणांना नोटीस जारी केली आहे. परंतु न्यायालयाने मद्रास उच्च न्यायालयाच्या आदेशाला अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला आहे.
मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांच्या सरकारने मद्रास उच्च न्यायालयाच्या मदुराई खंडपीठाच्या 6 जानेवारी रोजीच्या आदेशाला आव्हान दिले आहे. सणाच्या दिवशी पारंपरिक स्वरुपात दीप प्रज्ज्वलित करण्याचा निर्देश खंडपीठाने दिला होता. तिरुप्परनकुंद्रम पर्वतावर दीप प्रज्ज्वलित करण्याशी निगडित ‘दीपम वाद’ मदुराई येथील प्रसिद्ध तिरुप्परनकुंद्रम पर्वतावर धार्मिक परंपरा आणि पूजा-अधिकारांवरून निर्माण झालेला आहे. हा पर्वत हिंदू अन् मुस्लिम दोघांसाठी श्रद्धेचे केंद्र मानला जातो. पर्वतावर भगवान मुरुगनचे प्राचीन मंदिर हिंदूंसाठी 6 प्रमुख ‘अरुपडई वीडु’मध्ये सामील आहे, तर पर्वतावर एक सूफी दर्गा देखील आहे.