आ .रवींद्र चव्हाण यांना भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद मिळणार ?
सूत्रांची माहिती
सावंतवाडी । प्रतिनिधी
भाजपचे नेते आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले माजी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांना फडणवीस सरकार मध्ये मंत्रिपद मिळणार नसले तरी त्यांच्यावर पक्षातर्फे मोठी जबाबदारी देण्यात येणार आहे. भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपद रवींद्र चव्हाण यांना मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांना मंत्रीपद देण्यात आलेले नाही अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असलेले श्री चव्हाण यांनी. लोकसभा निवडणुकीत कोकण विभागात घवघवीत यश मिळवून दिले. त्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतही भाजपला मोठे यश मिळवून दिले आहे. आतापर्यंत कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, प्रथमच श्री चव्हाण यांनी कोकण विभाग भाजपमय केले आहे. त्यामुळे त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात येणार आहे. त्यांची पक्ष संघटना बांधणी कौशल्य उत्तम आहे त्यामुळे ही जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात येणार आहे.