For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दिपक केसरकर राज्यात एक नंबरचे मताधिक्य मिळविणार : अशोक दळवी

12:30 PM Nov 12, 2024 IST | अनुजा कुडतरकर
दिपक केसरकर राज्यात एक नंबरचे मताधिक्य मिळविणार     अशोक दळवी
Advertisement

न्हावेली / वार्ताहर
ही निवडणूक वाईट प्रवृत्ती विरुद्ध कर्तृत्ववान जनसेवक अशीच होत आहे.जनतेने वारंवार नाकारलेले पुन्हा निवडणूक लढवीत आहेत.केसरकर यांनी गेल्या पाच वर्षात अडीच हजार कोटी रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला . त्यांचे कार्य ,विनयशीलता ,तसेच त्यांना महायुतीची भक्कम लाभलेली साथ, माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची त्यांना असलेली साथ यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.राज्यात लक्षवेधी काम केलेल्या त्यांच्या कार्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री वारंवार कौतुक केले आहे.असे कार्यसम्राट शिक्षणमंत्री दिपक केसरकर महाराष्ट्रातील नंबर एकचे मताधिक्य मिळवून विजयी होणार.असा विश्वास शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी व्यक्त केला.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तिन्ही जागांवर महायुतीचे उमेदवार एकतर्फी निवडून येणार असा दावा दळवी यांनी केला.

Advertisement

दळवी पुढे म्हणाले की,केसरकरांनी पंधरा वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीत करोडो रुपयांचा निधी मतदार संघासाठी आणला. गेल्या पाच वर्षात अडीच कोटींचा निधी आणला.त्यांच्याकडे समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाच्या समस्या सोडवण्याच्या त्यांनी प्रयत्न केला.त्यामध्ये तो कोणत्या पक्षाचा आहे.याचा विचार केला नाही त्यांच्या कार्याचा राज्यभर दबदबा आहे.राज्यातील महत्वाच्या निर्णय प्रकियेत त्यांचा सहभाग घेतला जातो .हे आपल्या मतदारसंघाचे भाग्य आहे.त्यांना राज्यभर मिळणारा मान व त्यांच्या कर्तृत्वाचा काहीजणांना पोटशूळ उठला आहे.त्यामुळे उठसूट ते टिका करीत असल्याचे श्री.दळवी म्हणाले.केसरकरांच्या विरोधी उमेदवार राजन तेली हे जनतेने वारंवार नाकारलेले उमेदवार आहेत.या उलट केसरकर यांनी नगरसेवक, नगराध्यक्ष ,सहकारी बॅंक आमदार अशा सर्व निवडुका एकतर्फी जिंकल्या आहेत.तेली यांना जिल्हा परिषद निवडणुकीतही पराभवाचा सामना करावा लागला होता.जिल्हा परिषद जिल्हा बॅंक निवडणुकीत सलग दोन वेळा पराभव स्वीकारावा लागला . अशा प्रत्येक निवडणुकीत त्यांना जनतेने नाकारलेले आहे.ते आज केसरकरांवर टीका करीत आहेत.जनतेला केसरकर आपलेसे वाटतात कारण मतदारसंघातील प्रत्येकासाठी आधारवड बनून त्यांनी काम केलंय. अनेक रुग्णांना वैयक्तिक पातळीवर त्यांनी मदत केली असल्याचे ते म्हणाले.दळवी पुढे म्हणाले की,काही माणसे पैशाने मतदारांना विकत घेण्याची स्वप्नच पाहतायत . तुमचा या मतदारसंघाशी काय संबंध ? तुम्ही पैसा कसा कमावला? जनतेसाठी काय केलात ? हे सर्व जनतेला माहित आहे. पावसाळयात जशी अळंबी येतात.तशी निवडणूक आली की ,प्रवृत्ती डोकेवर काढत असतात त्यामुळे अशा प्रवृतीला जनताच मतपेटीतून उत्तर देणार असल्याचे दळवी म्हणाले.

केसरकर यांच्या कार्यालयाचे दरवाजे जनतेसाठी नेहमीच उघडे असतात. सामान्य मतदारांचा फोनही ते रिसिव्ह करतात.सामान्य माणूस समोर दिसला तर आपली गाडी थांबून त्याची चौकशी करतात. मात्र काही जणांकडे कोणतेही लोकनियुक्त पद नसताना सुद्धा त्यांच्या कार्यालयात जाण्यासाठी सुरक्षेचे कडे ओलांडून जावे लागते.फोन तर हे कोणाचे घेतच नाहीत आज त्यांचा एवढा रुबाब तर आमदार झाल्यावर त्यांची काय स्थिती असेल? असा प्रश्न आज जनताच विचारत आहे.या मतदारसंघात केसरकर यांच्या विरोधात बाहेरची माणसे निवडणुक लढवीत आहे.त्यांना जनतेचे देणेघेणे नाही. फक्त त्याच्या नसानसात स्वार्थ भिनला आहे . अशा स्वार्थी लोकांना जनता ओळखून आहे.या प्रवृत्तीला मतपेटीतून धडा शिकवल्याशिवाय जनता राहणार नाही असे दळवी म्हणाले.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडाच्या काळात त्यांनी शिवसेनेची प्रभावी बाजू मांडली हे संपूर्ण देशाने पाहिले. कुठच्याही आरोप प्रत्यारोप यामध्ये न अडकता शांतपणे जनतेचा विकास या एकाच ध्येयाने प्रेरित होऊन केसरकर सतत कार्यरत असतात.अशा या कार्यसम्राट जनसेवकाला महाराष्ट्रातील नंबर एकचे मताधिक्य देऊन इतिहास घडवूया असे आवाहनही जिल्हाप्रमुख अशोक दळवी यांनी मतदारांना केले.

Advertisement

Advertisement
Tags :

.