महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

गुजरातमध्येही भाजपचा पराभव करणार !

06:39 AM Jul 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था / अहमदाबाद 

Advertisement

ज्या प्रमाणे अयोध्येत भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा पराभव आम्ही केला, तसा गुजरातमध्येही पुढच्या विधानसभा निवडणुकीत या पक्षाचा पराभव आम्ही करु असे प्रतिपादन काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विपक्ष नेते राहुल गांधी यांनी केले आहे. त्यांनी शनिवारी अहमदाबाद येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आमचे येथील कार्यालय जाळले आहे. तसेच आम्हाला त्रास दिला आहे. आम्ही त्यांना धडा शिकविणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

गांधी यांनी लोकसभेत हिंदूंसंबंधी अवमानास्पद उद्गार काढले आहेत, असा आरोप करत भारतीय जनता पक्षाच्या युवा शाखेच्या कार्यकर्त्यांनी 2 जुलैला काँग्रेसच्या अहमदाबाद जिल्ह्यातील कार्यालयावर निदर्शने केली होती. त्यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्यांची झटापट झाली होती. काँग्रेसचे कार्यालय जाळण्यात आल्याचा आरोप त्या पक्षाने केला होता. मात्र तो आरोप नाकारण्यात आला होता.

गांधीच्या पुतळ्याचे दहन

राहुल गांधी यांनी हिंदू हे हिंसाचारी आणि असत्य वर्तन करणारे असतात असा आरोप लोकसभेत केला असून त्यावरुन ते हिंदुद्वेष्टे असल्याचे सिद्ध होते, असा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. अहमदाबाद येथे गांधी आले असताना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रतिमेचे दहन करुन निषेध व्यक्त केला. राहुल गांधी यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरही टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेची निवडणूक फैझाबाद मतदारसंघातून लढविणार होते. तथापि, पराभवाच्या भीतीने त्यांनी तसे केले नाही, असा आरोपही गांधी यांनी केला, अयोध्या फैझाबाद मतदारसंघात आहे.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article