For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur | वैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण करणार : मंत्री हसन मुश्रीफ

02:24 PM Oct 28, 2025 IST | NEETA POTDAR
kolhapur    वैद्यकीय क्षेत्रात कोल्हापूरची वेगळी ओळख निर्माण करणार   मंत्री हसन मुश्रीफ
Advertisement

               सीपीआरमध्ये अत्याधुनिक सुविधांचा लोकार्पण सोहळा

Advertisement

कोल्हापूर : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालयात अत्याधुनिक एम.आर.आय.सिटी स्कॅन, मॅमोग्राफी, अल्ट्रा सोनोग्राफी सुविधा तसेच अत्याधुनिक मॉड्युलर ऑपरेशन थिएटर कॉम्प्लेक्सचे लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते.

यावेळी व्यासपीठावर आमदार अमल महाडिक, आदिल फरास, राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजित लोकरे, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्या माने, गोकुळचे संचालक युवराज पाटील, महेश सावंत, अनिकेत जाधव, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्य. अभियंता रोहित तोंदले, डॉ गिरीश कांबळे आदी उपस्थित होते

Advertisement

मंत्री मुश्रीफ म्हणाले, सीपीआर येथे ज्येष्ठ नागरिक तसेच दारिद्रय रेषेखालील रुग्णांसाठी एमआरआय, सिटी करण्याचा मानस मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी बोलून दाखवला. स्कॅनची सुविधा मोफत राबविण्यात येणार आहे. या ठिकाणी आणण्यात आलेल्या मशिन्स या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त आहेत. त्यामुळे रुग्णांचे अचूक निदान होऊन त्यांच्यावर पुढील उपचार तत्काळ करणे सोयीचे होईल. तसेच या ठिकाणी जंतुसंसर्गाचा धोका नसेल.

सर्व सोयी सुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण लवकरच

वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुविधांसाठी तब्बल एक हजार कोटी रुपयांचा निधी आणल्याचे सांगून सीपीआरच्या अत्याधुनिक तसेच सर्व सोयी सुविधायुक्त इमारतीचे लोकार्पण फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात करण्याचा मानस मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी बोलून दाखवला.

Advertisement
Tags :

.