For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढविणारच

06:01 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
2024 मध्ये लोकसभा निवडणूक लढविणारच
Advertisement

उमा भारती यांची टीकमगढ येथील सभेत घोषणा

Advertisement

मध्यप्रदेशात टीकमगढ येथे प्रचारसभेला संबोधित करताना माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेत्या उमा भारती यांनी 2024 मध्ये लोकसभा निवडणूक कुठल्याही स्थितीत लढविणारच, अशी घोषणा केली आहे. 2019 ची लोकसभा निवडणूक लढविण्यास मीच नकार दिला होता, परंतु आता 2024 ची निवडणूक लढविण्याची पूर्ण तयारी असल्याचे त्या म्हणाल्या.

भाजपच्या निवडणूक प्रचार व्यवस्थापन समितीकडून हेलिकॉप्टरची व्यवस्था न झाल्याने उमा भारती यांनी नाराजी व्यक्त केली. उमा भारती या रेल्वेप्रवास करत टीकमगड येथे पोहोचल्या. बुंदेलखंडमधून सामंतवाद नष्ट करण्यासाठी दीर्घ लढाई लढावी लागल्याचे त्यांनी सभेत बोलताना म्हटले आहे.

Advertisement

भाजपमधून बंडखोरी करत बाहेर पडून निवडणूक लढविणारे लोक काँग्रेसला लाभ मिळवून देणार आहेत. तर मागील 10 वर्षांमध्ये केंद्र सरकारमधील कुठल्याही नेत्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. तर काँग्रेस सत्तेवर असताना भ्रष्टाचार करणाऱ्या मंत्र्यांची मोठी यादी होती, असा दावा उमा भारती यांनी केला आहे.

Advertisement
Tags :

.