महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

युद्ध लढण्याची पद्धत बदलणार : सीडीएस

07:00 AM Nov 22, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

नवी दिल्ली : चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल अनिल चौहान यांनी इंटरनॅशनल सेंटरमध्ये भविष्यातील युद्धांविषयी माहिती दिली आहे. तंत्रज्ञान जसजसे प्रगत होत आहे तसतसे आधुनिक युद्धात आमुलाग्र बदल दिसून येत असल्याचे चौहान यांनी म्हटले आहे. युद्धाचे विकसित स्वरुप आणि भविष्यातील युद्धासंदर्भात भारताच्या तयारीसंबंधी त्यांनी विस्तृतपणे माहिती दिली आहे.  युद्ध नेहमीच मनुष्यांदरम्यान एक स्पर्धा राहिली आहे. कुणी प्रगत शस्त्रास्त्रांनी सज्ज असू शकते, प्रभावी बॉडी आर्मर, तलवार, भाला किंवा आधुनिक रायफलने युक्त असू शकते, किंवा त्याच्याकडे प्रभावी गतिशीलता असू शकते. तरीही याच्या व्रेंद्रस्थानी युद्ध नेहमीच मनुष्यांदरम्यानच राहिले आहे. आता युद्धाची पद्धत बदलणार आहे. आतापर्यंत जे युद्ध मनुष्यांदरम्यान व्हायचे, भविष्यात त्यात यंत्रं जागा घेणार आहेत. कृत्रिम बुद्धीमत्ता आणि अन्य प्रगत तंत्रज्ञानं ही युद्धभूमीच्या डिजिटलीकरणावर केंद्रीत असल्याचे चौहान यांनी नमूद पेले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article