महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

चंपाई सोरेन भाजपमध्ये जाणार ?

06:28 AM Aug 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

झारखंडमधील वनवासी समाजातील प्रभावशाली नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री चंपाई सोरेन भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. या राज्याचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक करण्यात आल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला होता. त्यांच्यास्थानी चंपाई सोरेन यांची नियुक्ती करण्यात आली होती.

Advertisement

तथापि, हेमंत सोरेन यांची जामीनावर सुटका झाल्यानंतर चंपाई सोरेन यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा आदेश देण्यात आला. तथापि, ज्या पद्धतीने त्यांचा राजीनामा घेण्यात आला, त्यामुळे ते नाराज झाले होते. त्याची नाराजी अद्यापही कायम असून त्यामुळेच ते झारखंड मुक्ती मोर्चा या पक्षाचा त्याग करणार आहेत आणि भारतीय जनता पक्षात समाविष्ट होणार आहेत, असे बोलले जाते. ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याचाही आरोप होत आहे. हा आरोप झारखंड मुक्ती मोर्चाचे आमदार लोबिन हेब्रोम यांनी केला आहे. आसामचे भारतीय जनता पक्षाचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी चंपाई सोरेन यांची प्रशंसा केली असून झारखंडमध्ये विकास कामे झाली ती केवळ त्यांच्याच सहा महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात, असेही प्रतिपादन त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article