‘बीएसएनएल’ जिओ-एअरटेलला जोराची टक्कर देणार?
टाटा समूहाचीही मिळणार सोबत: बीएसएनएल नव्या योजनेच्या तयारीत
नवी दिल्ली :
सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) मोठे नियोजन करण्याच्या तयारीत आहे. कंपनीने सध्या देशात त्यांचे 4 जी नेटवर्क उभारत आहे आणि सध्या 5 जी नेटवर्कची बांधणी करण्यास सुरुवात करत आहे. याकरीता टाटा समूहाची कंपनी टाटा कन्सल्टन्सी सोबत हातमिळवणी केली असल्याची माहिती आहे. दरम्यान टीसीएसच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, साइट आणि फ्रिक्वेन्सी रेंज ओळखल्यानंतर बीएसएनएलचे नेटवर्क 5 मध्ये अपग्रेट करण्यात येणार आहे. या उपक्रमासाठी टीसीएसला सल्लागार बनविण्यात आले आहे. यामुळे टीसीएसचे रेडिओ उपकरण सॉफ्टवेअर अपग्रेडसह 5 जी पर्यंत वाढविण्यात येणार असल्याची माहिती आहे.
सेंटर ऑफ डेव्हलपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स (सी-डीओटी) द्वारे राबविण्यात येणारा कोर हे 5 जी नॉन स्टॅण्डअलोन सपोर्ट देणारे पहिले उपकरण ठरणार आहे. बीएसएनएलकडे 700 एमएचझेड, 900 एमएचझेड, 2,100 एमएचझेड, 2,500 एमएचझेड आणि 3,500 एमएचझेड फ्रिक्वेन्सी बँडमध्ये स्पेक्ट्रम राहणार आहे. टीसीएसच्या नेतृत्वाखालील संघात सी डॉट आणि टाटा समूह फर्म तेजस नेटवर्क याचा समावेश राहणार आहे.
कधी सुरु होणार नेटवर्क?
सुब्रमण्यम तेजस नेटवर्क्सचे अध्यक्ष देखील आहेत, त्यांनी सांगितले की, आम्ही स्थापन कमिशनिंग आणि ऑप्टिमायझेशन पूर्ण झाल्यानंतर साइट्स बीएसएनएलकडे सोपविण्यात येणार आहेत. यांची प्रक्रिया पुढील काही महिन्यात होणार असल्याचेही सांगितले आहे.
देशात आम्ही पुरेसे कव्हरेज मिळवू
बीएसएनएलचे अध्यक्ष रॉबर्ट जे रवी म्हणाले की, संबंधीत एक लाख साइट्स आम्ही देशात पुरेसे कव्हरेज मिळवण्यात यशस्वी होऊ. आम्ही आणखी एक योजना घेऊन येत आहोत. जी आमची क्षमता वाढविणार आहे, अशी आम्हाला खात्री असल्याचेही अध्यक्ष रॉबर्ट यांनी स्पष्ट केले आहे.