For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राहूल नार्वेकरांविरोधात अविश्वास आणणार! उद्धव ठाकरे यांचे जाहीर आव्हान

06:50 AM Jan 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
राहूल नार्वेकरांविरोधात अविश्वास आणणार  उद्धव ठाकरे यांचे जाहीर आव्हान
Advertisement

 : एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल

Advertisement

मुबंई : प्रतिनिधी

शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी महापत्रकार परिषद  घेऊन विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी आमदार अपात्रता प्रकरणात  दिलेला निकाल कसा चुकीचा होता याबाबतचे दावे केले. त्यासोबतच त्यांनी भाजप अन् एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेला उत्तर म्हणून विधानसभा अध्यक्ष यांनी ठाकरे गटाकडून करण्यात आलेले आरोप फेटाळून लावत जोरदार टीकास्त्र  केले आहे.

Advertisement

यावेळी त्यांनी राज्यपाल रमेश बैस यांनी विधानसभा अध्यक्षांच्याविरोधात विशेष अधिवेशन बोलवून अविश्वासाचा प्रस्ताव आणावा, असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिले आहे.  ठाकरे गटाच्या महापत्रकार परिषदेत ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनीदेखील भूमिका मांडली. यावेळी त्यांनी क्रिनवर थेट 2014 ची शिवसेनेची प्रतिनिधी सभाच दाखवली. या प्रतिनिधी सभेत मांडण्यात आलेल्या 6 ठरावांविषयी त्यांनी माहिती दिली.  शिवसेनेची घटना दुऊस्ती कधीकधी करण्यात आली याबाबत अनिल परब यांनी माहिती दिली. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भूमिका मांडली.

मुळात हा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने लवाद म्हणून अध्यक्षांकडे दिला. पात्र -अपात्र ठरविण्याविषयी त्याना सांगण्यात आले होते. मात्र त्यांनी तसे ठरवले नसल्याने मिंधे गट कोर्टात गेला. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. तुम्ही नेमलेला अध्यक्ष आहे. राज्यपालांना सांगतो अधिवेशन बोलवा. विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास आणा. आम्ही तुम्हाला पाठिंबा देतो. होऊन जाऊ द्या, असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

  जो निकाल दिला, त्याविरोधात न्यायालयात

गेल्या आठवड्यात  लवादाने जो निकाल दिला, त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात गेलो आहोत. सर्वोच्च न्यायालयाकडून शेवटची आशा आहे. सर्वोच्च न्यायालय हे लोकशाहीची जनता आहे. त्यामुळे त्या न्यायालयात आम्ही गेलो आहोत. देशात मतदार सरकार ठरवत असतो. कदाचित जगात आपला एकमेव किंवा कमी देश आहे ज्यांनी जनतेच्या चरणी संविधान अर्पण केले आहे. सरकार कुणाचेही असले तर जनता सर्वोच्च असली पाहिजे. हा सूर्य हा जयद्रथ. आता तरी निकाल मिळावा. न्याय मिळाला पाहिजे. पुरावा पुरावा की गाडावा, असा सवाल ठाकरेंनी केला.

नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावे

नार्वेकर आणि मिंध्यांनी जनतेत यावे, असे माझे आव्हान आहे. पोलीस प्रोटोक्शन घ्यायचे नाही. मीही पोलीस घेणार नाही. तिथे नार्वेकर यांनी  शिवसेना कुणाची, हे सांगावे. मग  कुणाला पुरावा, तुडवावा की गाडावा, हे जनतेने सांगावे. माझ्यात हिंमत आहे. माझी तयारी आहे. शिवसेना तुम्ही विकली असाल. ती काही विकावू वस्तू नाही. आज इथे लाखो शिवसैनिक आहेत, असे देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

  निवडणूक आयोगाच्या दाखविण्यात येणाऱ्या पत्रात तथ्य नाही 

सध्या ठाकरे गटाकडून दाखविण्यात येणाऱ्या पत्रात ही तथ्य नसल्याचे नार्वेकर यांनी सांगत त्यावर निवडणूक आयोगाचे निव्वळ स्टॅम्प आहे. मात्र यात लिहिलेले विषयाला धऊन नसल्याचे नार्वेकर यांनी सांगितले. ज्या मुद्याचा सध्या प्रचार होत आहे त्याचा उल्लेख ही या पत्रात नसल्याचे नार्वेकर म्हणाले. या पत्रात 2013 ला झालेल्या घटना दुऊस्तीचा उल्लेख नसल्याचे नाही. दरम्यान अनेक माध्यमांतून समाजामध्ये एक गैरसमज पसरवत असून तसे ते पसरवू नयेत. निकाल दिल्यानंतर स्पष्टीकरण देणे गरजेचे नसतानाही मी संवैधानिक पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल गैरसमज पसरविणे चुकीचे असून विधिमंडळ अस्मितेसाठी हे योग्य नसल्याचे राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले.

Advertisement
Tags :

.