For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

कर्नाटकात भाजप वरचढ ठरणार?

06:20 AM Jun 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
कर्नाटकात भाजप वरचढ ठरणार
Advertisement

विविध संस्थांच्या अनुमानानुसार भाजप-निजद युतीला 20 ते 24 तर काँग्रेसला 3 ते 6 जागा शक्य

Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

लोकसभेसाठी अंतिम टप्प्यातील मतदान संपताच मतदानोत्तर निकालाचे अंदाज विविध संस्थांनी वर्तविले आहेत. कर्नाटकातही भाजप वरचष्मा राखणार असल्याचे बहुतेक सर्व संस्थांचे अनुमान आहे. राज्यात 28 मतदारसंघांमध्ये 26 एप्रिल आणि 7 मे अशा दोन टप्प्यात लोकसभेसाठी मतदान झाले होते. निवडणुकीसाठी भाजप आणि निजदने युती केली. भाजपने 25 तर निजदने 3 जागांवर निवडणूक लढविली आहे. काँग्रेसने सर्व 28 जागांवर निवडणूक लढविली आहे. 4 जून रोजी मतमोजणीनंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

Advertisement

टीव्ही 9 पोल स्ट्रॉट पिपल्स इनसाईटच्या अंदाजानुसार भाजपला 18, निजदला 2 आणि काँग्रेसला 8 जागा मिळतील. न्यूज 18 पोल हबनुसार भाजपला 21 ते 24 व काँग्रेसला 3 त 7 जागा मिळविण्याचे अनुमान आहे. निजद किंवा इतर पक्षाचे उमेदवार निवडून येण्याची शक्यता कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. एक्सीस माय इंडियाच्या सर्वेक्षणानुसार भाजप-निजद युतीला 23 ते 25 आणि काँग्रेसला 3 ते 5 जागा मिळू शकतील, असे अनुमान आहे.

टुडेज चाणक्यच्या अंदाजानुसार भाजप-निजद युतीला 24 हून अधिक तर काँग्रेसला 4 हून अधिक जागा मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. रिपब्लिक पी-एमएआयक्यूच्या अंदाजानुसार युतीला 22 आणि काँग्रेसला 6 जागा मिळू शकतील. पब्लिक टीव्ही-मॅट्रीज एक्झीट पोलनुसार युतीला 21 आणि काँग्रेसला 7 जागा मिळण्याचा अंदाज आहे.

संस्था                         भाजप                    निजद               काँग्रेस

सी-व्होटर्स                        23                    2                    3 ते 5

पोल हब                        21 ते 24            1 ते 2                  3 ते 7

इंडिया टीव्ही                  18 ते 22            1 ते 3                  4  ते 8

इंडिया टुडे                       20 ते 22            2 ते 3                  3  ते 5

एक्सीस माय इंडिया           23 ते 25            -                        3  ते 5

सीएनएन                        20 ते 23            1 ते 3                  3  ते 7

Advertisement
Tags :

.