कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

‘मिग-21’ला दिमाखात निरोप देणार

06:33 AM Sep 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

26 सप्टेंबरला चंदीगडमध्ये शेवटचे उड्डाण : हवाई दलाकडून भावनिक व्हिडिओ जारी

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारतीय हवाई दलातील सर्वात जास्त काळ सेवा देणारे लढाऊ विमान मिग-21 आता काही दिवसांतच अधिकृतपणे निवृत्त होणार आहे. 62 वर्षांच्या गौरवशाली सेवेनंतर हे विमान 26 सप्टेंबर रोजी चंदीगडमध्ये शेवटचे उ•ाण करणार आहे. मिग-21 च्या निरोपाच्या या ऐतिहासिक क्षणाला खास बनवण्यासाठी हवाई दलाने एका विशेष कार्यक्रमाची तयारी केली आहे. या सोहळ्याला देशाचे संरक्षणमंत्री आणि हवाई दल प्रमुख देखील उपस्थित राहणार आहेत.

मिग-21 हे भारतीय हवाई दलाचे पहिले सुपरसॉनिक लढाऊ विमान होते. त्याने 1965 आणि 1971 च्या युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. या विमानाने पाकिस्तानचे अनेक हल्ले हाणून पाडले आणि भारतीय लष्करी शक्तीचे प्रतीक बनले. सहा दशकांपूर्वी हे विमान हवाई दलात सामील झाल्यानंतर आता त्याला अंतिम निरोप दिला जात आहे. हवाई दलाने ‘मिग-21’ संबंधी एक व्हिडिओही जारी केला असून त्यात विमानाच्या विविध हालचाली किंवा कामगिरींची दखल घेण्यात आली आहे.

2019 मध्ये विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांनी याच ‘मिग-21’ विमानातून उ•ाण करत पाकिस्तानचे एफ-16 विमान पाडले होते. या मिग-21 च्या आठवणी अजूनही लोकांच्या मनात ताज्या आहेत. या धाडसी कृतीने पुन्हा एकदा जगाला मिग-21 ची क्षमता आणि भारताच्या हवाई शक्तीची जाणीव करून दिली.

निरोपाची झलक देणारा व्हिडिओ प्रसिद्ध

भारतीय हवाई दलाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर मिग-21 चा गौरवशाली प्रवास दाखवणारा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये वैमानिकांच्या भावना, जुन्या फुटेज, युद्धसराव आणि मोहिमांची झलक रेकॉर्ड केली आहे. हवाई दलाने या ऐतिहासिक प्रसंगी मिग-21 शी संबंधित वैमानिकांनाही आमंत्रित केले आहे. सदर वैमानिक या क्षणाचे साक्षीदार होणार आहेत.

या निरोप समारंभात एक विशेष लढाऊ सराव देखील आयोजित केला जाणार असून त्यामध्ये मिग-21 ची लढाऊ क्षमता दाखवली जाईल. या दरम्यान, मर्यादित तांत्रिक साधनसंपत्ती असूनही या विमानाने शत्रूंच्या प्रगत विमानांना कसे पराभूत केले हे प्रेक्षकांना पाहायला मिळेल. आता उ•ाण केल्यानंतर मिग-21 च्या स्क्वाड्रनची चावी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना सुपूर्द केली जाईल. त्यानंतरहे विमान इतिहासाचा भाग होईल. याप्रसंगी एअर चीफ मार्शल ए. पी. सिंग देखील उपस्थित राहतील.

मिग-21 ची जागा ‘तेजस मार्क 1-ए’ घेणार

मिग-21 च्या निवृत्तीनंतर आता भारतात विकसित केलेले स्वदेशी लढाऊ विमान तेजस मार्क 1-ए त्याची जागा घेणार आहे. हे बहु-भूमिका लढाऊ विमान आधुनिक क्षेपणास्त्रs आणि रडार तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे. हे जगातील सर्वात हलके लढाऊ विमान मानले जाते आणि लवकरच ते हवाई दलाचा भाग होणार आहे.

तंत्रज्ञानातील बदलामुळे निवृत्ती

मिग-21 ने अनेक युद्धांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली असली तरी, कालांतराने त्याचे तंत्रज्ञान जुने झाले आहे. 1971 पासून मिग-21 चे सुमारे 400 हवाई अपघात झाले आहेत. ज्यात 200 हून अधिक वैमानिक आणि 50 हून अधिक नागरिकांनी आपले प्राण गमावले आहेत. म्हणूनच ते निवृत्त करणे आता काळाची गरज बनली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article