For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धार्मिक नेत्याच्या मृत्यूचा सूड घेणार

06:14 AM Jul 12, 2026 IST | Tarun Bharat Portal
धार्मिक नेत्याच्या मृत्यूचा सूड घेणार
Advertisement

वृत्तसंस्था/ तेहरान (इराण)

Advertisement

अमेरिका आणि इस्रायल यांनी एकत्रित हल्ला करुन आमचे प्रमुख धार्मिक नेते आयातोल्ला अली खामेनेई यांची हत्या केली आहे. त्यांच्या हत्येचा सूड घेतला जाईल. त्यांचे मारेकऱ्यांना सुखाने नैसर्गिक मृत्यू येणार नाही, अशी धमकी इराणचे नेते मुजतबा खामेनेई यांनी दिली आहे. इराण अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या हत्येचा कट रचत आहे, अशी माहिती काही दिवसांपूर्वी इस्रायलच्या गुप्तहेर संस्थेने अमेरिकेला दिली आहे. मुजतबा खामेनेई यांच्या ताज्या धमकीमुळे इस्रायलने दिलेल्या संदेशाचे गांभीर्य वाढले आहे. परिणामी राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा ट्रंप यांच्या संभाव्य धोक्यावर चर्चा होऊ लागली आहे. ट्रंप यांच्यावर यापूर्वी दोनदा जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. असा प्रयत्न जर इराणने केला, तर तो देश उध्वस्त केला जाईल, असे प्रत्युत्तर डोनाल्ड ट्रंप यांनी दिले आहे. इराणला उडविण्यासाठी आमची 1 हजार अतिबलशाली क्षेपणास्त्रे सज्ज आहेत. ही क्षेपणास्त्रे कोणत्याही क्षणी इराणला नष्ट करु शकतात, हे त्या देशाच्या नेतृत्वाने लक्षात ठेवावे, असा इशाराही अमेरिकेने दिला असून इराणने कोणतेही दु:साहस करु नये. तसे केल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल, असे अमेरिकेने स्पष्ट केले आहे.

Advertisement
Advertisement
Tags :

.