For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement
Maharashtra Government – Diwali

एशियन पेंट्स अंतरिम लाभांश देणार?

06:21 AM Oct 08, 2026 IST | Tarun Bharat Portal
एशियन पेंट्स अंतरिम लाभांश देणार
Advertisement

29 ऑक्टोबरपर्यंत निर्णय घेणार असल्याचे संकेत

Advertisement

नवी दिल्ली : शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना लवकरच लाभांशातून कमाई करण्याची आणखी एक संधी पेंट कंपनी एशियन पेंट्स घेऊन आलीय आहे. कंपनी आपल्या भागधारकांना लाभांश देणार आहे. कंपनीने एक्सचेंजला कळवले आहे की, या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात होणाऱ्या संचालक मंडळाच्या बैठकीत तिचे संचालक अंतरिम लाभांशावर निर्णय घेणार आहेत.

यापूर्वी, कंपनीने लाभांशासाठी रेकॉर्ड तारीख जाहीर केली आहे.

Advertisement

कंपनीची संचालक मंडळाची बैठक 29 ऑक्टोबर रोजी होणार आहे. त्यानंतर कंपनी अंतरिम लाभांश देणार असल्याची घोषणा केली जाईल. कंपनीने एक्सचेंजला कळवले आहे की, लाभांश जाहीर करण्याची रेकॉर्ड तारीख 4 नोव्हेंबर, 2026 असेल. या तारखेला कंपनीच्या नोंदींमध्ये नोंदणीकृत असलेल्या पात्र भागधारकांना लाभांश मिळणार असल्याची माहिती आहे.

संचालक मंडळाच्या बैठकीत निकालांवर निर्णय घेतला जाईल? लाभांशाव्यतिरिक्त, संचालक मंडळ 30 सप्टेंबर 2026 रोजी संपलेल्या तिमाही आणि सहामाहीच्या आर्थिक निकालांवरही विचार करेल. या बैठकीत कंपनीच्या लेखापरीक्षित स्वतंत्र आणि लेखापरीक्षित नसलेल्या एकत्रित निकालांना मंजुरी देण्याचा प्रस्ताव असेल. कंपनीने असेही कळवले आहे की, नामनिर्देशित व्यक्तींसाठी शेअर्सच्या व्यवहारासाठीची ट्रेडिंग विंडो 2 नोव्हेंबर 2026 पर्यंत बंद राहील. ही विंडो 18 सप्टेंबरपासून बंद आहे.

Advertisement
Tags :

.