For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

अमेरिका गाझाचे विभाजन करणार?

06:26 AM Nov 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
अमेरिका गाझाचे विभाजन करणार
Advertisement

इस्रायलकडे ‘ग्रीन झोन’ तर पॅलेस्टाईनकडे ‘रेड झोन’ सोपविण्याचा विचार

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिका गाझापट्टीचे दोन भाग करण्याची तयारी करत आहे. त्यानुसार ‘ग्रीन झोन’ आणि ‘रेड झोन’ असे दोन भागात विभाजन करण्याची दीर्घकालीन योजना तयार करण्यात आली आहे. ‘ग्रीन झोन’ भागावर आंतरराष्ट्रीय सुरक्षा दल (आयएसएफ) आणि इस्रायली सैन्याचे नियंत्रण असेल. तर पॅलेस्टिनी लोकांची वस्ती असलेला दुसरा भाग ‘रेड झोन’ म्हणून ओळखला जाणार आहे. ‘रेड झोन’मधील बहुतांश भाग सध्या उद्ध्वस्त झाला असून त्यातील जवळजवळ सर्व पॅलेस्टिनी विस्थापित झाले आहेत.

Advertisement

‘द गार्डियन’च्या एका अहवालात गाझापट्टीच्या विभाजनासंबंधी महत्त्वपूर्ण दावा करण्यात आला आहे. हा अहवाल अमेरिकेच्या लष्करी गुप्तचर कागदपत्रांवर आणि अधिकाऱ्यांच्या वैयक्तिक निवेदनांवर आधारित आहे. अहवालानुसार, या योजनेची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया यापूर्वीच सुरू झाली आहे. ही संपूर्ण योजना अलिकडच्या युद्धबंदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या आश्वासनांवर प्रश्न उपस्थित करते. यापूर्वी गाझा एकसंध होईल आणि पॅलेस्टिनी राजवट पुनर्संचयित केली जाईल, असे ट्रम्प प्रशासनाने म्हटले होते.

गाझाच्या पूर्व भागात ग्रीन झोन तयार केला जाणार आहे. इस्रायली सैन्यासोबत येथे परदेशी सैन्य तैनात केले जाईल. येथे पुनर्विकासाचे काम केले जाईल. येथे आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांच्या तैनातीसाठी अमेरिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेकडून औपचारिक मान्यता मिळविण्याचा प्रयत्न करत आहे. योजनेनुसार, सुरुवातीला येथे काहीशे सैन्य तैनात केले जाईल. ही संख्या नंतर 20,000 पर्यंत वाढवता येईल. कोणत्याही परदेशी सैन्याला ग्रीन झोनमधून बाहेर पडण्याची परवानगी दिली जाणार नाही, असे समजते. इस्रायलच्या नियंत्रणाखालील यलो लाइनच्या पश्चिमेकडील भागाला रेड झोन म्हटले जाणार आहे. येथे कोणताही पुनर्विकास केला जाणार नाही. दोन वर्षांच्या युद्धात या भागाचे सर्वाधिक नुकसान झाले असून सुमारे 20 लाख लोकसंख्या अडकली आहे.

Advertisement
Tags :

.