For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

एसीच्या किंमती 7 ते 10 टक्के वाढणार?

06:20 AM Jan 17, 2026 IST | Tarun Bharat Portal
एसीच्या किंमती 7 ते 10 टक्के वाढणार
Advertisement

तांबे वर्षभरात 60 टक्के महागल्याचा परिणाम

Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

येणाऱ्या उन्हाळी हंगामामध्ये एसी खरेदी करू इच्छिणाऱ्यांना जादा पैसे खर्च करण्याची तयारी करावी लागणार आहे. येत्या काळामध्ये एसी म्हणजेच एअर कंडीशनरच्या किंमती 7 ते 10 टक्के वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

Advertisement

का वाढणार किंमती

एसीच्या किंमती वाढण्यामागे महत्त्वाचे कारण गेल्या वर्षभरात तांब्याच्या किंमतीत झालेली वाढ सांगितली जात आहे. तांब्याचा वापर एसीच्या कॉईल्स, वायर्स, तसेच इतर घटकांसाठी प्रामुख्याने केला जातो. तांब्याच्या किंमतीमध्ये गेल्या वर्षभरामध्ये पाहता 60 टक्के इतकी वाढ झाली आहे. परिणामी एसी बनविणाऱ्या कंपन्यांना आपसुकच एसीच्या किंमती वाढविणे अपरिहार्य ठरणार आहे. दुसऱ्या बाजूला घरगुती उपकरणे, इलेक्ट्रीक वाहने, उर्जा पायाभूत उत्पादनांच्या किंमती देखील वाढण्याचे संकेत तज्ञांनी वर्तविले आहेत. या उद्योगातील तज्ञांच्या मते एसीच्या किंमती 7 ते 10 टक्के वाढू शकतील. एसी उत्पादनामध्ये वोल्टास, हॅवल्स, क्रॉम्प्टन ग्रीव्स आणि पॉलिकॅब यांच्याकडूनही वाढ केली जाऊ शकते. चिली आणि इंडोनेशियातून तांब्याच्या पुरवठ्यावरही सध्याला परिणाम होताना दिसत आहे.

Advertisement
Tags :

.