For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वणव्यांमुळे हवेत दरवर्षी 14.3 कोटी टन विष

06:58 AM Feb 11, 2026 IST | Tarun Bharat Portal
वणव्यांमुळे हवेत दरवर्षी 14 3 कोटी टन विष
Advertisement

गंभीर  आजारांचा धोका वाढवत आहे प्रदूषण

Advertisement

जगभरात जंगल, गवताळ मैदाने आणि पीटलँडमध्ये लागणाऱ्या आगी पूर्वीच्या अनुमानांच्या तुलनेत अधिक प्रमाणात हानिकारक वायू आणि कार्बनिय यैगिक वातावरणात सोडत आहेत. संशोधकांनी 1997-2023 दम्यना जळालेल्या वनस्पतींच्या जागतिक आकडेवारीचे विश्लेषण पेले आणि आगीतून निघणारे प्रदूषण वायू गुणवत्ता तसेच मानवी आरोग्यासाठी गंभीर धोका ठरल्याचे आढळू आले. जंगलांच्या आगीतून निघणाऱ्या धुरात केवळ कार्बन डायऑक्साइडच नव्हे, तर असे अनेक कार्बनिक यौगिकही असतात, जे अधिक धोकादायक ठरत आहेत. यात इंटरमीडियट आणि सेमी-वोलाटाइल ऑर्गनिक कंम्पाउंड्स सामील आहेत, जे उष्णतेमुळे वायू होतात आणि हवेत अत्यंत सुक्ष्म कणांचे रुप धारण करतात.

गंगेच्या मैदानापासून अमेझॉनपर्यंत प्रभाव

Advertisement

जागतिक हवामानशास्त्र संघटनेनेही स्वत:च्या अहवालात गंगेच्या मैदानातील धुके आणि अमेझॉनच्या जंगलांच्या आगीमुळे निघणारा धूर वायू प्रदूषण सातत्याने वाढवत असल्याचे मान्य केले आहे. याचा थेट प्रभाव मानवी आरोग्य, कृषी आणि अर्थव्यवस्थेवर पडत आहे. अहवालानुसार 2024 मध्ये अमेझॉनमध्ये लागलेल्या आगीतून निघालेला धूर हजारो किलोमीटर दूर वसलेल्या शहरांपर्यंत पोहोचला आणि तेथील हवेला गंभीर स्वरुपात प्रदूषित केले होते. अमेझॉन, कॅनडा ाअणि सायबेरिया यासारख्या क्षेत्रांमध्ये लागलेल्या आगीने प्रदूषणातील सुक्ष्म कण, खासकरून पीएम2.5 च्या स्तराला उच्चांकी स्तरावर पोहोचविले.

2001 नंतर 60 टक्के वाढले सीओ2 उत्सर्जन

जर्नल सायन्समध्ये प्रकाशित एका अन्य अध्ययनानुसार 2001 पासून वणव्यांमुळे कार्बन डायऑक्साइड (सीओ2) उत्सर्जनात सुमारे 60 टक्क्यांची वाढ झाली आहे. हवामानाबद्दल अत्याधिक संवेदनशील उत्तर बोरियल वनांमध्ये हे उत्सर्जन जवळपास तीनपटीपर्यंत वाढले आहे. संशोधनातून उष्णकटिबंधीय क्षेत्रांबाहेरील जंगलांमध्येही सीओ2 उत्सर्जनात उल्लेखनीय वाढ झाल्याचे आढळून आले. या क्षेत्रांमधून दरवर्षी सुमारे 50 कोटी टन अतिरिक्त सीओ2 वातावरणात जात आहे, यातून उत्सर्जनाचे केंद्र हळूहळू उष्णकटिबंधीय जंगलांमधून बाहेरच्या क्षेत्रांमध्ये सरकत असल्याचे संकेत मिळत आहेत. टास्मानिया विद्यापीठाच्या अध्ययनाने आगीच्या वाढत्या घटनांकडेही लक्ष वेधले आहे.

Advertisement
Tags :

.