महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

‘वाईल्ड वाईल्ड पंजाब’ 10 जुलैला झळकणार

06:35 AM Jun 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वरुण शर्मा मुख्य भूमिकेत

Advertisement

प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच वाइल्ड वाईल्ड पंजाब नावाचा चित्रपट येणार आहे. हा चित्रपट प्रत्येक प्रेमभंग झालेल्या व्यक्तीसाठी असल्याचा दावा निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. हा एक विनोदीपट असून त्याची निर्मिती लव रंजन आणि अंकुर गर्ग यांनी केली आहे.

Advertisement

या चित्रपटाचा प्रीमियर 10 जुलै रोजी नेटफ्लिक्सवर होणार आहे. ‘चार मित्र, एक मोठा प्रवास आणि एक्सला आय अॅम ओवर यू बोलण्याचा प्रयत्न. एका वाइल्ड वाइल्ड प्रवासासाठी स्वत:ला तयार ठेवा’ असे नेटफ्लिक्सने चित्रपटाची घोषणा करताना म्हटले आहे.

वरुण शर्मा यात खन्ने नावाची भूमिका साकारत असून त्याचा ब्रेकअप झालेला असतो. ब्रेकअपनंतर काय करावे असा प्रश्न त्याला पडलेला असतो. त्याचे मित्र अरोरे (सनी सिंह), जैनू (जस्सी गिल) आणि हनी पाजी (मनजोत सिंह) हे मित्र त्याला ब्रेकअपला सामोरा जाण्यासाठी प्रोत्साहित करतात. हे सर्व मित्र एका ब्रेकअप ट्रिपवर जातात. या चार मित्रांसोबत चित्रपटात पत्रलेखा आणि इशिता राज देखील दिसून येणार आहे.

हा चित्रपट ब्रोमान्स आणि वेडेपणाचे मिश्रण दाखविणारा आहे. सिमरप्रीत सिंह याचे दिग्दर्शक आहेत. यापूर्वी त्यांनी ‘हाफ लव हाफ अरेंज्ड’ आणि ‘कॉलेज रोमान्स’ या वेबसीरिजचे दिग्दर्शन केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article