Kas village wildlife | कास पठार परिसरात रानगव्याचे दर्शन; कुडेघर शिवारात शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण
01:22 PM Mar 31, 2026 IST | NEETA POTDAR
Advertisement
सातारा-पाटेघर रोडवर रानगव्याचा मुक्त संचार
Advertisement
कास -मंगळवारी सकाळी सातारा -पाटेघर रोडवरीलकुडेघर गाव परिसरात रानगव्याच्या अचानक दर्शनामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. सकाळच्या सुमारास काही शेतकऱ्यांना शेताजवळ मोठा गवा फिरताना दिसला त्याने मुख्य वाहतुकीच्या सातारा पाटेघर रोडवर येऊन वाहनचालकांची भांबेरी उडवली
गवा हा अत्यंत बलवान आणि आक्रमक स्वभावाचा वन्यप्राणी असल्यामुळे गावकऱ्यांनी तत्काळ सुरक्षित अंतर ठेवले. काही वेळ गवा शेत परिसरात फिरत राहिला, त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली.
गवा काही वेळाने जंगलाच्या दिशेने निघून गेल्याने मोठा अनर्थ टळला. मात्र या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.
Advertisement
Advertisement