For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

घराबाहेर लावावा लागतो पत्नीचा फोटो

06:54 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
घराबाहेर लावावा लागतो पत्नीचा फोटो

मुस्लीम देश ब्रुनेईमध्ये अजब परंपरा

Advertisement

आजवर तुम्ही घराबाहेर दरवाजाला किंवा भिंतीवर नेमप्लेट म्हणजेच त्या घरात राहणाऱ्या व्यक्तींचं नाव पाहिले असेल. नेमप्लेटवर काही लोक घरातील पुरुषांसह महिलांचीही नावे नमूद करतात. तसेच पतीसोबत पत्नीचंही नाव त्यावर असते.

पण एकेठिकाणी तुम्हाला घराबाहेर महिलांचे फोटो दिसून येतात. त्या घरात राहणाऱ्या व्यक्तीच्या पत्नीचे हे फोटो असतात. इथे घराबाहेर पत्नीचे फोटो लावणे बंधनकारक आहे. आजही राजेशाही असलेला मुस्लीम देश ब्रुनेईमध्ये ही अजब परंपरा आहे. अगदी तिथल्या राजानेही राजवाड्याबाहेर स्वत:च्या पत्नींचे फोटो लावले आहेत. या राजाला एकूण 6 पत्नी आहेत.ब्रिटिश राजवटीत राहिलेला हा देश 1 जानेवारी 1984 रोजी स्वतंत्र झाला. तेव्हापासून या देशात राजेशाही आहे. पण इथल्या महिला अनेक अधिकारांपासून वंचित आहेत. तेथील पुरुषांना बहुविवाह करण्याची अनुमती आहे. जे पुरुष एकापेक्षा अधिक विवाह करतात, त्यांना घराबाहेर भिंतीवर पत्नींचे फोटो लागावे लागतात.

Advertisement

ब्रुनेईचे राजे हसनल बोल्किया असून ते जगातील सर्वात धनाढ्या व्यक्तींपैकी एक आहेत. 2008 मध्ये ब्रुनेईच्या राजाची संपत्ती सुमारे 1 लाख 36 हजार 300 कोटी रुपयांची होती. वाहनांचे चाहते असलेल्या या राज्याची एक कार पूर्णपणे सोन्याने तयार करण्यात आली आहे. ब्रुनेईच्या राजाच्या महालात 1700 हून अधिक खोल्या आहेत. याला जगातील सर्वात मोठा आणि आलिशान महाल मानले जाते.

Advertisement

Advertisement
Tags :
×

.