For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Kolhapur News | कोडोलीतील व्हॅलेंटाईन डे ला झालेली भानामती घटस्पोटीत पत्नीवर; पतीला अटक

02:30 PM Feb 18, 2026 IST | NEETA POTDAR
kolhapur news   कोडोलीतील व्हॅलेंटाईन डे ला झालेली भानामती घटस्पोटीत पत्नीवर   पतीला अटक
Advertisement

                                                      कोडोलीत अघोरी प्रकार उघड

Advertisement

वारणानगर - आनंदनगर,कोडोली ता.पन्हाळा येथे व्हॅलेंटाईन डे दिवशी झाडावर काळी बाहुली,फोटोस खिळा मारून केलेली भानामती घटस्पोटीत पत्नीच्या मनात भिती उत्पन्न व्हावी यासाठी पतीनेच कृत्य केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून या प्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कोमल अरुण दरबारे वय २६ रा. आनंदनगर,कोडोली ता.पन्हाळा यांनी पती सागर रंगराव जेऊरकर रा.आनंदनगर कोडोली यांचे विरोधात फिर्याद नोंदवली आहे.पती सागर यांचेवर महाराष्ट्र नरबळी व आणि इतर अमानुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादु टोणा यांना प्रतिबंध अधिनियम २०१३ चे कलम ३ प्रमाणे गुन्हा दाखल झाला असून त्याला अटक करण्यात आली आहे या प्रकरणी राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष गोरे करीत आहेत.

Advertisement

फिर्यादी कोमल दरबारे हि झाल्या घटनेने भितीच्या छायेत वावरत होती त्यामुळे आई वडील यांच्याशी चर्चा करून कोडोलीत दि.१४ रोजी घडलेल्या गुन्ह्याची फिर्याद सोमवार दि.१६ रोजी रात्री उशिरा दिली.

फिर्यादी कोनल व आरोपी सागर पती पत्नी होते त्यांचे दोन वर्षापुर्वी सोडपत्र झाले असुन ते विभक्त राहणेस आहेस तेव्हा पासुन फिर्यादी ह्या आई वडीलांकडे राहणेस आहेत आरोपी सागर याने काळ्या रंगाचे बाहुलीला फिर्यादीचा फोटो लावुन त्या बाहुलीला काळया दोऱ्याने गोलाकार बांधुन त्यात लोखंडी मोळा व टाचण्या खवुन त्या बाहुलीवर गुलाल टाकुण आंधश्रद्धेची अनिष्ट,आघोरी प्रथा करुन फिर्यादी कोमल हिला भिती उत्पन्न व्हावी असे कृत्य केलेने आरोपी सागर यास अटक केली आहे.

Advertisement
Tags :

.