पत्नीची आत्महत्या,पोलीसासह सासूवर हुंडाबळीचा गुन्हा
सांगली :
चरित्र्यावर संशय घेऊन आणि लग्नात ऐपतीप्रमाणे पतीचा मानपान केला नसल्याच्या कारणावरून पत्नीचा छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबलसह दोघांवर हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत शिवाजी भिवा जाधव (रा. येवलुज गाव, ता. पन्हाळा ) यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल स्वप्निल सुनील कोलप (नेमणूक पोलीस मुख्यालय) आणि सुनिता सुनिल कोलप (रा. स्वप्न मनोरा बंगला, गव्हर्मेंट कॉलनी, वानलेसवाडी) या दोघांच्या विरोधात हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी जाधव यांची मुलगी अश्विनी उर्फ ऋतिका हिचा स्वप्निल कोलप याच्याशी विवाह झाला होता. दि. 6 फेब्रुवारी 2022 पासून तिच्या चरित्र्यावर संशय घेऊन आणि सुनील कोलप याच्या ऐपतीप्रमाणे त्याचा मानपान ठेवला नाही, असे म्हणून पती स्वप्नील आणि सासू सुनीता यांनी अश्विनी उर्फ ऋतिका हिचा छळ केला. या दोन्ही संशा†यतांनी तिचे जगणे असह्य केले होते. अखेर त्यांच्या छळाला कंटाळून दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सायंकाळी ऋतिका कोलप ( वय 25) तिने राहते घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
या दोघांच्या छळामुळेच तिने आत्महत्या केली असल्याची फिर्याद तिचे वडील शिवाजी जाधव यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात दि0 . 11 डिसेंबर रोजी दिली आहे.