पत्नीला खांद्यावर घेत धावण्याची शर्यत
जितकी वजनदार पत्नी तितकेच मोठे इनाम
फिनलंडची राजधानी हेलसिंकीनजीकचे सोनकाजार्वी शहर दरवर्षी एका अनोख्या आणि मजेशीर आयोजनाचे साक्षीदार ठरते. येथे आयोजित ‘वाइफ कॅरिंग वर्ल्ड चॅम्पियनशिप’ म्हणजेच पत्नी उचलून घेण्याची जागतिक स्पर्धा आता पूर्ण जगात प्रसिद्ध झाली आहे.
या शर्यतीत पती स्वत:च्या पत्नीला खांद्यावर उचलून घेत अडथळेयुक्त कोर्सवर धावतो. शर्यतीत पाण्याचा प्रवाह, वाळू, उंच अडथळे आणि चिंचोळे मार्ग सामी असतात. शर्यतीचा नियम अत्यंत रंजक आहे. जे दांपत्य सर्वप्रथम फिनिश लाइन पार करेल त्याला इनामादाखल विजेत्या पत्नीच्या वजनाइतकी बियर मिळते. म्हणजेच जितकी वजनदार पत्नी, तितके मोठे इनाम. याचमुळे अनेक मजबूत पती अधिक वजन असलेल्या पत्नीसह या शर्यतीत भाग घेतात.
ही स्पर्धा 1992 मध्ये सुरू झाली होती आणि फिनलंडच्या एका जुन्या लोककथेवर आधारित आहे. कथेनुसार 19 व्या शतकात एका लुटारूने गावातील महिलांना उचलून देण्यास सुरुवात केली होती. आता हा प्रकार मजेशीर अन् प्रतिस्पर्धी खेळ ठरला आहे. दरवर्षी जगातील 50 हून अधिक देशांमधील दांपत्य यात सहभागी होण्यासाठी येतात. शर्यतीचा कोर्स सुमारे 253 मीटर लांब असतो, यात अनेक अडथळे असतात, पत्नीला खांद्यावर घेत धावणे सोपे नसते. अनेकदा पती-पत्नी पडतात, ज्यामुळे प्रेक्षकांना मजेशीर अनुभव मिळतो. सुरक्षेची पूर्ण काळजी घेतली जाते, तरीही हा अत्यंत फिजिकल अन् एंटरटेनिंग स्पोर्ट आहे. 2025 च्या चॅम्पियनशिपमध्ये अनेक देशांच्या जोडप्यांनी भाग घेतला होता. एस्टोनिया, फिनलंड, स्वीडन, अमेरिका आणि भारतातील काही दांपत्यही यात सामील झाले होते. एका भारतीय दांपत्याने प्रयत्न केला, परंतु ते टॉप-10 मध्ये पोहोचू शकले नव्हते. स्पर्धेत फिनिश जोडप्यांची कामगिरी सर्वात चांगली असते.
विजेत्याला मद्यरुपी इनाम
विजेत्याला मिळणाऱ्या बियरचे प्रमाण अनेकदा 80-120 लिटरपर्यंत असते. बियर पिण्यापेक्षा अधिक मजा शर्यतीदरम्यान येते असे अनेक विजेते सांगतात. हा इव्हेंट केवळ स्पर्धा नाही तर पती-पत्नीदरम्यान टीमवर्क, मजबुती आणि ह्यूमरलाला प्रोत्साहन देतो. ही स्पर्धा पर्यटनालाही चालना देते, दरवर्षी हजारो पर्यटक ही स्पर्धा पाहण्यासाठी फिनलंडमध्ये पोहोचतात. स्थानिक अर्थव्यवस्थेलाही याचा लाभ होतो. हा इव्हेंट फिनलंडच्या मस्तीयुक्त संस्कृतीला जगासमोर सादर करतो असे आयोजकांचे म्हणणे आहे. तर काही लोक याला महिला सन्मानाच्या विरोधात ठरवतात, पण बहुतांश महिला स्वत:हून यात आनंदाने सहभागी होत असतात.