Sangli Crime |"तू चांगली वागत नाहीस..." म्हणत घरात वाद; जीव वाचवून पळणाऱ्या पत्नीच्या डोक्यावर पतीने केला काठीने प्रहार!
चारित्र्यावर संशयातून पत्नीला काठीने अमानुष मारहाण
पलूस: चारित्र्यावर संशय घेऊनपतीने पत्नीला काठीने अमानुष मारहाण केल्याची घटना पलूस तालुक्यातील बांबवडे येथे घडली आहे. याबाबत पलूस पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, दि. ०१ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास उषा सतीश विक्कड (वय ३५,व्यवसाय मजुरी, रा. बांबवडे) या त्यांच्या राहत्या घरासमोर असताना पती सतीश नागनाथ विक्कड (वय ४०) हा दारूच्या नशेत घरी आला. त्याने "तू चांगली वागत नाहीस" असे म्हणत चारित्र्यावर संशय घेत बाद सुरू केला.
याबाबत पत्नीने जाब बिचारल्याने पतीने तिला शिवीगाळ करत लाबाबुक्क्यांनी मारहाण करू लागला. जीव वाचवण्यासाठी पत्नी उषा घराबाहेर पळून गेली असता संशयित सतीश बिक्कड तिच्या मागे जाऊन दारात पडलेली कळकाची काठी उचलून तिच्या डोक्याच्या उजव्या बाजूस जोरात प्रहार केला. या मारहाणीत उषा या जखमी झाल्या. याबाबत पलूस पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.