चौफेर विक्रीने शेअरबाजार कोसळला
सेन्सेक्स 780 अंकांनी घसरणीत, ट्रम्प टॅरिफचा परिणाम
वृत्तसंस्था/मुंबई
अमेरिकेतील ट्रम्प प्रशासनाकडून भारतीय वस्तुंवर 500 टक्के टॅरिफ लावण्यासंदर्भातील केलेल्या घोषणेचा परिणाम भारतीय शेअरबाजारावर गुरुवारी पहायला मिळाला. सेन्सेक्स चौफेर विक्रीमुळे 780 अंकांनी आणि निफ्टीदेखील 264 अंकांनी घसरणीत राहिला. 8 डिसेंबर नंतर शेअर बाजारामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात घसरण अनुभवायला मिळाली. गुरुवारी एकाच दिवशी गुंतवणूकदारांना जवळपास 8 लाख कोटींचे नुकसान सोसावे लागले आहे.
गेल्या चार सत्रामध्ये पाहता सेन्सेक्स निर्देशांक जवळपास 1600 अंकांनी तर निफ्टी निर्देशांक जवळपास 470 अंकांनी घसरला आहे. गुरुवारी सरतेशेवटी मुंबई शेअरबाजारचा 30 समभागांचा सेन्सेक्स निर्देशांक 780 अंकांनी कोसळत 84180च्या स्तरावर बंद झाला. दुसरीकडे निफ्टी निर्देशांक देखील 264 अंकांच्या घसरणीसोबत 25876 अंकांवर बंद झाला. बँक निफ्टी निर्देशांकदेखील 304 अंकांनी खाली येत 59680च्या स्तरावर बंद झाला.
समभागांची कामगिरी
विविध समभागांची कामगिरी पाहिल्यास इटर्नल, एसबीआय लाईफ, आयसीआयसीआय बँक, बजाज फिनसर्व, आयडीएफसी फर्स्ट बँक, डिक्सन टेक्नॉलॉजी, सोलर इंडस्ट्री, अपोलो टायर आणि ओबेरॉय रियल्टी यांचे समभाग तेजीत राहिले होते. घसरणीमध्ये पाहता हिंडाल्को, विप्रो, जिओ फायनान्सीयल, ओएनजीसी, लार्सन अँड टूब्रो, टेक महिंद्रा, आयटीसी, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, इन्फोसिस, ट्रेंट, रिलायन्स, टाटा स्टील, सनफार्मा, जेएसडब्ल्यू स्टिल, टाटा कंझ्युमर, इंडिगो, भारती एअरटेल, मारुती सुझुकी या समभागांचा समावेश होता. विविध क्षेत्रांच्या निर्देशांकाचा विचार करता, सर्वच निर्देशांक आज निराशाजनक कामगिरीसोबत बंद झाले. सर्वाधिक घसरण एनर्जी व आयटी निर्देशांक, एफएमसीजी निर्देशांकांची दिसून आली. या तिन्ही निर्देशांकांनी अनुक्रमे 1033 अंक, 768 अंक व 483 अंकांची घसरण नोंदवली.
समभाग वधारलेल्या कंपन्या
- इटर्नल 283
- आयसीआयसीआय 1435
- बजाज फायनान्स 971
- भारत इलेक्ट 415
- एसबीआय लाईफ 2082
समभाग घसरलेल्या कंपन्या
- लार्सन अॅण्ड टुब्रो 4028
- टेक महिंद्रा 1577
- टीसीएस 3204
- रिलायन्स इंडस्ट्रीज 1470
- टाटा स्टील 180
- ट्रेन्ट 3988
- पॉवरग्रिड कॉर्प 259
- इन्फोसिस 1613
- एनटीपीसी 344
- सनफार्मा 1760
- बजाज फिनसर्व्ह 2009
- अल्ट्राटेक सिमेंट 12046
- स्टेट बँक 997
- भारती एअरटेल 2066
- मारुती सुझुकी 16627
- एशियन पेन्टस 2794
- अॅक्सिस बँक 1286
- महिंद्रा-महिंद्रा 3724
- टायटन 4247
- कोटक महिंद्रा 2132
- हिंदुस्थान युनि 2386
- एचडीएफसी बँक 946
- आयटीसी 340
- अदानी पोर्ट 1464
- हिंडाल्को 903
- बीपीसीएल 354
- जिओ फायनान्स 293
- विप्रो 231
- जेएसडब्ल्यू स्टील 1156
- डॉ.रेड्डीज लॅब 1207
- टीसीएस 3204
- बँक ऑफ बडोदा 299
- अंबुजा सिमेंट 546
- ब्रिटानिया 6026
- श्री सिमेंट 26833
- कॅनरा बँक 150