महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ट्रेंड का मूर्खपणा!

06:02 AM Feb 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तोंडात स्ट्रॉबेरी भरून गिळण्याचा प्रकार

Advertisement

सोशल मीडियावर अनेक प्रकारचे ट्रेंड समोर येत असतात. आता जो ट्रेंड सुरू आहे तो हटके आहे. हे चॅलेंज केवळ महिलांदरम्यान सुरू आहे. महिला स्वत:चा व्हिडिओ आणि छायाचित्रे सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत. या चॅलेंजमध्ये महिला स्वत:च्या तोंडात स्ट्रॉबेरी भरून मग हळूहळू न चावता गिळत आहेत. स्ट्रॉबेरीला दातांचा वापर न करता गिळावे लागते. हा ट्रेंड सध्या चीनमध्ये सुरू असून याची सुरुवात 11 जानेवारीपासून झाली आहे.

Advertisement

स्ट्रॉबेरी कशी गिळावी याचे प्रात्यक्षिक व्हिडिओद्वारे महिलांस

मोर मांडण्यात आले आहे. स्ट्रॉबेरीतील लाल रंगाचा हिस्सा सेवन करावा असे सांगण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर महिला स्ट्रॉबेरीसोबत छायाचित्रे पोस्ट करत आहेत. या छायाचित्रांसोबत त्या ‘लीच गॉड्स’ असे नमूद करत आहेत. माझ्या तोंडात स्ट्रॉबेरी भरल्यावर मला जणू हवेचा प्रवाह कमी झाल्याचे वाटले असे एका महिलेने म्हटले आहे.

या ट्रेंडवरून सोशल मीडियावर लोक विविध प्रकारे व्यक्त होत आहेत. हा जणू नवा चायनीज कुंग फू असल्याचे मला वाटल्याचे एका युजरने म्हटले आहे. अशाप्रकारच्या कृतीतून फळाची चव अधिक चांगल्याप्रकारे घेता येईल असा दावा काही लोकांनी केला आहे. स्ट्रॉबेरीसोबत कीवी आणि केळी देखील तोंडात धरून गिळल्याचे एका महिलेने म्हटले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article