महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

विषयत्यागाचा निश्चय का टिकत नाही?

06:48 AM Jun 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अध्याय पहिला

Advertisement

स्थिरबुद्धि मनुष्याला सुख काय किंवा दु:ख काय दोन्हीही तात्पुरती आहेत हे लक्षात आलेलं असल्याने तो दोन्हीबाबत उदासीन असतो. त्याच्या ताब्यात इंद्रिये आलेली असतात आणि विवेकाने तो त्यांच्यावर नियंत्रण करत असतो. सतत चुळबुळत असलेल्या मनाला त्यानं ईश्वराच्या अनुसंधानात गुंतवून टाकलेले असते. त्याने कासवाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून इंद्रियांना विषयांपासून आवरून धरलेलं असतं. कासव संकटकाळी इंद्रिये आत ओढून घेऊन स्वस्थ बसते. त्याप्रमाणे माणसाने वासनेच्या आहारी जाण्याचा धोका दिसल्यास आपल्या इंद्रियांवर विवेकाने मात करावी. तसेच पुन:पुन्हा इच्छा, वासना होऊ नयेत म्हणून मनाला ईश्वराच्या स्मरणात गुंतवून त्याला स्थिर करायचा प्रयत्न करावा. असे झाले की, मनात इतर विचार येण्याचे हळूहळू बंद होईल.

Advertisement

ईश्वरस्मरणात मन स्थिर होण्यासाठी तोंडाने नामस्मरण करून कानांनी ते ऐकण्याचा सराव करावा. हा एक टप्प्याटप्प्याने करावयाचा प्रवास असून ब्रह्मप्राप्तीत याचा शेवट होतो. अशा पद्धतीने इंद्रियांवर मात करायचीच असते अशी सवय लागल्यावर स्वभावात बदल होऊन तो इंद्रियांवर हुकुमत गाजवू लागतो. हे सर्व निरपेक्षतेने साध्य होते. माणसाच्या मनात आलं आणि त्यानं लगेच पदवी मिळवली असं कधी होत नाही. त्यासाठी बालवाडीपासून सुरुवात करून एक एक इयत्ता पार करून कॉलेजमध्ये बरीच वर्षे शिक्षण घेतल्यावर पदवी पदरात पडते. अध्यात्माचे तसेच आहे.

निरपेक्ष होणे इथून सुरवात करायची आहे आणि टप्प्याटप्प्याने तिच्यावर हुकूमत प्राप्त करायची आहे. ती संपूर्णत: हाती आली की ब्रह्मप्राप्ती होते. माणूस एकदम ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून घीसाडघाईने प्रयत्न करू लागतो पण येथे सावचितपणे, सबुरीने प्रयत्न करावे लागतात असा उपदेश बाप्पा पुढील काही श्लोकात करतात.

व्यावर्तन्ते:स्य विषयास्त्यक्ताहारस्य वर्ष्मिण: ।

विना रागं च रागो पि दृष्ट्वा ब्रह्म विनश्यति ।। 56।।

अर्थ-ज्याने विषयांचे सेवन टाकले आहे त्या मनुष्याचे विषय परत येत नाहीत पण त्यांविषयीची इच्छा मात्र परत येते. ही इच्छा ब्रह्मदर्शन झाल्यावरच नाश पावते.

विवरण- मनुष्याला विषय अगदी हवेहवेसे वाटत असतात. त्यातून मिळणाऱ्या क्षणिक सुखात तो रममाण होत असतो. बरं, विषय एकदा भोगले आता बास, असं कधीच होत नाही. आणखीन थोडं, आणखीन थोडं असं करत करत आयुष्य सरलं तरी माणसाची विषयभोगाची इच्छा काही संपुष्टात येत नाही. म्हणून या इच्छांचा त्याग करण्यासाठी विषयांचा उपभोग घेणं थांबवावे असे विचार करून तो ब्रह्मप्राप्तीच्या मागे लागतो. त्यासाठी विषयत्यागाचा विचार करून तो त्यानुसार वागतो. बाप्पांनी श्लोकात आहार हा शब्द वापरला आहे. बाप्पांना इथं आहार म्हणजे केवळ खाणे असा अर्थ अभिप्रेत नसून आपल्या ज्ञानेंद्रियांमार्फत भोगायच्या सर्व गोष्टी असं बाप्पांना म्हणायचं आहे. आता विषयत्याग म्हणजे डोळ्यांना जे बघायला आवडतंय, कानांना जे ऐकायला आवडतंय, जिभेला जे गोड लागतंय, त्वचेला ज्याचा स्पर्श आवडतो, नाकाला जो वास हवाहवासा वाटतो अशा सर्व गोष्टींचं सेवन टाळायचं. म्हणजे त्या गोष्टी करायच्या नाहीत. असं ठरवलं की, काही काळ मनुष्य विषयत्याग करण्यात यशस्वीही होतो. पुढं बाप्पा असं सांगतायत अमुक एक गोष्ट सोडायची असं एखाद्यानं ठरवलं आणि त्यानुसार ती गोष्ट करायची टाळली तरी त्या वस्तूचे विचार त्याच्या मनातून न जाता त्याला भंडावून सोडतात. त्यामुळे काही काळ तो निग्रहाने त्यापासून जरी लांब राहिला तरी मनात त्या वस्तूबाबतचे विचार चालूच असतात. त्यामुळे इंद्रिये प्रबळ होऊन बंड करतात आणि त्या विषयाचे सेवन केल्याशिवाय ती गप्प बसत नाहीत.

क्रमश:

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article