पावसाळ्यात दही का खाऊ नये?
पावसाळ्यात अनेक आजार पसरण्याचा धोकाही असतो. म्हणूनच या काळात आरोग्याची, तसेच खाण्या-पिण्याची विशेष काळजी घेणे गरजेचं असते. बऱ्याच वेळेला पावसाळ्यात घरातील मोठी माणसं दही न खाण्याचा सल्ला देतात. त्यामागे कारणही तसेच आहे. पावसाळ्यात दही खाल्ल्याने आरोग्याचे मोठे नुकसान होऊ शकते. मात्र हे असे का होते, ते आपण जाणून घेऊयात.
पावसाळ्यात आहारात जास्त दही खाल्ल्याने सर्दी, घसा खवखवण्याची समस्या होऊ शकते. छातीत कफ वाढल्याने श्वास घेण्यास त्रास होतो. या दिवसात जास्त दही खाल्ल्याने अंग दुखायला लागतं.आंबट आणि थंड दही खाल्ल्याने संधिवाताचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच ज्या लोकांना सांधेदुखी सारख्या हाडांच्या समस्यांनी त्रस्त आहे, त्यांनीही पावसात दह्याचे सेवन कमी करावे. दह्याचा प्रभाव थंड असल्याने दही खाल्यावर जरा नियंत्रण ठेवा किंवा अजिबातच खाऊ नका.पावसाळ्याच्या दिवसात आपली पचनक्रिया तशीही थोडी मंदावते. त्यातच या ऋतूत आपण दही खाल्ले तर पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे ॲसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो. म्हणूनच पावसाळ्यात दही खाणे टाळावे.पावसाळ्यात ओलाव्यामुळे दही खराब होऊ शकतं यासोबतच त्यामध्ये अनेक प्रकारचे बॅक्टेरिया वाढण्याची भीती असते, ज्यामुळे संसर्ग होऊ शकतो. जर तुम्हाला दही खायचं असेल तर ते ताजं खा, जास्त वेळ फ्रिजमध्ये ठेवलेलं दही खाऊ नका नाहीतर पोटात संसर्ग होऊ शकतो.
(वरील माहिती सर्वसामान्य ज्ञानावर आधारित आहेत.अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)