युरेनियम कशासाठी आवश्यक?
वीज उत्पादन (3-5 टक्के)
यूरेनियमद्वारे वीज निर्माण करायची असल्यास यूरेनियमला 3-5 टक्क्यांपर्यंत इनरिच करावे लागेल. म्हणजेच यू-235 मध्ये 3-5 टक्के यूरेनियम असल्यास त्याचा वापर आण्विक ऊर्जा प्रकल्पांमध्ये केला जाऊ शकतो आणि याद्वारे वीज निर्माण केली जाऊ शकते. या यूरेनियमला ‘लो इनरिच्ड यूरेनियम’ म्हटले जते. जगभरातील आण्विक ऊर्जा प्रकल्प याच स्तराचे यूरेनियम स्वत:च्या आण्विक संयंत्रांमध्ये वीजनिर्मितीसाठी वापरतात.
न्यूक्लियर रिसर्च रिअॅक्टर, कॅन्सर ट्रीटमेंट (20 टक्के)
यूरेनियमचे इनरिचमेंट 20 टक्क्यांपर्यंत झाल्यास याचा वापर नौदलाच्या पाणबुड्यांच्या रिअॅक्टर्समध्ये केला जातो. यूरेनियमच्या या अवस्थेला हायली इनरिच्ड यूरेनियम म्हटले जाते. या पातळीपर्यंत यूरेनियम अत्यंत शक्तिशाली आणि विध्वंसक ठरलेले असते. यूरेनियम-235 चे इनरिचमेंट जितके अधिक तितकेच ते घातक, विध्वंसक आणि शक्तिशाली होत जाते.
अणुबॉम्ब (90 टक्के)
इनरिचमेंट 90 टक्क्यांवर पोहोचल्यावर ही सामग्री अणुबॉम्ब निर्माण करण्यासाठी तयार होते. यूरेनियमच्या या अवस्थेत न्यूट्रॉनची टक्कर झाल्यास चेन रिअॅक्शन सुरू होते आणि प्रचंड प्रमाणात ऊर्जा उत्सर्जित होते. याला वेपन ग्रेड यूरेनियम म्हटले जाते.