For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भारतात एआयकरता अमेरिकन डॉलर्सचा खर्च का?

06:41 AM Jan 19, 2026 IST | Tarun Bharat Portal
भारतात एआयकरता अमेरिकन डॉलर्सचा खर्च का
Advertisement

ट्रम्प यांच्या पूर्वाश्रमीच्या सहकाऱ्याचा सवाल : व्यापार करार रखडल्याने संताप

Advertisement

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

अमेरिकेच्या व्हाइट हाउसमधील माजी व्यापार सल्लागार पीटर नवारो यांनी भारतावरून कठोर टिप्पणी केली आहे. तसेच त्यांनी भारतात पुरविण्यात येणाऱ्या एआय सेवांबद्दल प्रश्न उपस्थित केले आहेत. अमेरिकेचे लोक भारतात देण्यात येणाऱ्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्स (एआय) सेवेसाठी पेमेंट का करत आहेत हेच मला समजत नसल्याचे नवारो यांनी म्हटले आहे.

Advertisement

चॅटजीपीटी, जेमिनी समवेत अनेक एआय प्लॅटफॉर्म अमेरिकेच्या भूमीवरून संचालित होतात, तसेच ते अमेरिकेची वीज, पाणी आणि स्रोतांचा वापर करतात. तर दुसरीकडे याच एआय प्लॅटफॉर्म भारतात मोफत उपलब्ध होत असल्याचे म्हणत नवारो यांनी याला अमेरिकेच्या आर्थिक धोरणांच्या विरोधात ठरविले आहे.

भारत एआयसाठी मोठी बाजारपेठ

भारत एक मोठी बाजारपेठ असून येथे प्रत्येक कंपनी स्वत:च्या एआय मॉडेलला लाँच करत आहे. तसेच भारतीय लोकांदरम्यान एआय अत्यंत लोकप्रिय देखील ठरत आहे. गुगल आणि ओपनएआयच्या प्रेड सब्सक्रिप्शनला भारतात मोफत करण्यात आले आहे. दूरसंचार कंपन्यांसोबत अनेक पेड मॉडेलला मोफत वापरासाठी उपलब्ध करण्यात आले आहे.

रशियन कच्चे तेल खरेदीचा उल्लेख

पीटर नवारो यांनी भारताकडून रशियन कच्चे तेल खरेदी होत असल्याचा आरोप पुन्हा केला आहे. भारत रशियाकडुन कच्चे तेल स्वस्त दरात खरेदी करत रशियाच्या अर्थव्यवस्थेला हातभार लावत असल्याचा दावा नवारो यांनी केला आहे.

भारत टॅरिफ किंग

नवारो यांनी पुन्हा एकदा निशाणा साधत भारताला टॅरिफ किंग संबोधिले आहे. भारत अमेरिकेच्या उत्पादनांवर अत्यंत अधिक प्रमाणात आयातशुल्क आकारतो. यामुळे अमेरिकेच्या कंपन्यांचे मोठे नुकसान होत असल्याचा आरोप नवारो यांनी केला आहे.

भारतात अनेक एआय कंपन्या

भारत सध्या जगातील टॉप एआय इकोसिस्टीममध्ये सामील आहे. येथे एआय कंपन्या आणि स्टार्टअपच्या संख्येत वेगाने वाढ होतेय. भारतात 2 हजारांहून अधिक एआय  कंपन्या आणि स्टार्टअप्स आहेत. येथे गुगलचे जेमिनी, ओपनएआयचे चॅटजीपीटी इत्यादी उपलब्ध आहेत. अहवालानुसार जेनएआय स्टार्टअप्सची संख्या जवळपास 890 हून अधिक झाली असून ही संख्या वेगाने वाढत चालली आहे.

कितीही बदला, परंतु परंपरा विसरू नका!

Advertisement
Tags :

.