महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोल्हापुरला सहपालकमंत्रिपद का ?

12:21 PM Jan 19, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर : 

Advertisement

सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या गळ्यात कोल्हापूर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची माळ पडली असताना सोबत सहपालकमंत्री ही कोल्हापूरला दिल्याने जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सहपालकमंत्री पदाची चर्चा रंगली आहे. आबिटकर यांना प्रशासन चालवण्याचा अनुभव असला तरी त्यांची प्रथमच राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली आहे. त्यामुळे मंत्रीमंडळात आबिटकर नवखे आहेत म्हणून राज्यमंत्री माधूरी मिसाळ यांना सहपालकमंत्री पद दिले ? की आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून कॅबिनेट, पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्ह्यात ताकदवान बनलेल्या शिवसेना शिंदेगटावर अंकुश ठेवण्यासाठी आणि भाजपचे स्थानिक नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पाठबळ मिळावे या हेतुने भाजपने सहपालकमंत्री पद आपल्याकडे ठेवले, अशा तर्कविर्तकांना उधाण आले आहे.

Advertisement

राधानगरी विधानसभा मतदार संघातून सलग तीन वेळा आमदार झालेले प्रकाश आबिटकर यांची यंदा प्रथमच राज्याच्या मंत्रीमंडळात वर्णी लागली. त्यांनी थेट पॅबिनेट मंत्री पद मिळविले. जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाचे राजेश क्षीरसागर, प्र्रकाश आबिटकर, चंद्रदीप नरके असे तीन आणि सहयोगी राजेंद्र पाटील-यड्रावकर असे चार आमदार आहेत. तर भाजपचे अमल महाडिक, राहूल आवाडे असे दोन सहयोगी जनसुराज्य शक्ती पक्षाचे डॉ. विनय कोरे, अशोकराव माने आणि अपक्ष शिवाजी पाटील असे पाच आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ हे एकमेव आमदार आहेत. जिल्ह्dयातील भाजपसोबत असणाऱ्या एकाही आमदाराला मंत्रीपद मिळाले नाही. तर शिवसेना शिंदे गटाने आमदार प्रकाश आबिटकर यांना कॅबिनेट मंत्री केले.

मंत्रीमंडळा विस्तारानंतर जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी रस्सीखेच सुरु झाली. ज्याचे आमदार जास्त त्या पक्षाला पालकमंत्री पद या फॉर्म्युल्यानुसार कोल्हापूरचे पालकमंत्री पद शिवसेना शिंदेगटाला मिळण्यासाठी स्थानिक आमदार आग्रही होते. तर भाजपकडून उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचेही नाव पालकमंत्री पदासाठी चर्चेत होते. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री यांचेही पालकमंत्री पदासाठी प्रयत्न सुरु होते. अखेर पालकमंत्री पदाची माळ शिवसेना शिंदेगटाच्या गळ्यात पडली असली तरी सहपालकमंत्री पद भाजपने आपल्याकडे ठेवत शिवसेना शिंदेगटावर अप्रत्यक्षरित्या अंकुश ठेवण्याचे काम केले का प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

पुरोगामी विचाराचा पगडा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यात भाजपने 2009 च्या विधानसभा निवडणुकीत तत्कालीन आमदार सुरेश हाळवणकर यांच्या रुपाने प्रथमच प्रवेश केला. यानंतरच्या 2014 च्या निवडणुकीत आमदार सुरेश हाळवणकर यांच्यासह आमदार अमल महाडिक असे दोन आमदार मिळाले. जिल्ह्यात भाजपची गाडी प्रगतीपथावर असताना 2019 च्या निवडणुकीत या दोन्ही आमदारांचा पराभव झाला आणि जिल्ह्dयात भाजपची पुन्हा पिछेहाट झाली. 2019 नंतर भाजपला जिल्ह्याच्या राजकारणावर प्रभाव असणाऱ्या महाडिक घरण्याचे बळ मिळाले. 2019च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून निवडणुक लढवत असताना पराभव झालेले धनंजय महाडिक यांनी निवडणुकीनंतर लगेचच भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपने त्यांना राज्यसभेचे खासदार करत बळ दिले. 2024 च्या निवडणुकीत जिल्ह्यात भाजप, जनसुराज्य, अपक्ष असे एकूण पाच आमदार आहेत. पण यापैकी एकालाही मंत्री पदात संधी मिळालेली नाही. त्यामुळे भाजपची जिल्ह्यात सुरु असलेली यशस्वी घोडदौड पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कायम ठेवण्यासाठी सहपालकमंत्री पदाच्या माध्यमातून भाजपने ही खेळी केली का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित होत आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article