For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

समन्सकडे दुर्लक्ष का केला?

06:21 AM Apr 29, 2024 IST | Tarun Bharat Portal
समन्सकडे दुर्लक्ष का केला
Advertisement

अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

Advertisement

 ► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

दिल्ली मद्य घोटाळाप्रकरणी तुऊंगात असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. या सुनावणीदरम्यान केजरीवाल यांच्या वकिलांना न्यायालयाने ईडीच्या समन्सकडे वारंवार दुर्लक्ष केल्याबाबत विचारणा केली. तसेच जामीनाबाबत काही याचिका दाखल केली आहे का? असा प्रश्नही केला. याला उत्तर देताना अभिषेक मनु सिंघवी यांनी कोणतीही याचिका दाखल केलेली नाही, असे स्पष्ट केले. तसेच  अरविंद केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावाही करण्यात आला. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठाने केजरीवाल यांचा युक्तिवाद ऐकला. याप्रकरणी मंगळवारीही सुनावणी होणार आहे. यापूर्वी केजरीवाल यांना उच्च न्यायालयाकडून झटका बसला होता. दिल्ली उच्च न्यायालयाने केजरीवाल यांची अटक योग्य असल्याचे स्पष्ट करत कोठडीची मुदत वाढवली होती.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी झालेल्या सुनावणीवेळी केजरीवाल यांच्यावतीने अभिषेक मनु सिंघवी यांनी विविध बचावात्मक मुद्दे मांडले.  अरविंद केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक करण्यात आली होती. कलम 19 अंतर्गत अटक करण्यामागे ईडीकडे कोणती कारणे होती? ईडी ज्या कागदपत्रांबद्दल बोलत आहे, त्यांच्याशी अरविंद केजरीवाल यांचा काहीही संबंध नाही, असे त्यांनी न्यायालयासमोर सांगितले. गेल्या 18 महिन्यांत ईडीने जेव्हा ईसीआयआर दाखल केल्यानंतर कोणालाही अटक झाली नाही. केजरीवाल यांच्या अटकेच्या दीड वर्षापूर्वी खटला सुरू झाला. 3 आरोपपत्र दाखल करण्यात आली. सीबीआयनेही आरोपपत्र दाखल केले. सीबीआय प्रकरणात केजरीवाल यांचे नाव नसताना अटक कशी काय होऊ शकते? अशी बाजू सिंघवी यांनी मांडली. डिसेंबर 2023 पर्यंत मद्य धोरण प्रकरणात सीबीआय आणि ईडीने न्यायालयात 10 कागदपत्रे सादर केली. यात केजरीवाल यांचे नाव कोठेही नव्हते, असेही सांगण्यात आले.

सुनीता आणि आतिशी केजरीवालांच्या भेटीला

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सध्या तिहार तुऊंगात आहेत. सोमवारी त्यांच्या भेटीला पत्नी सुनीता आणि मंत्री आतिशी पोहोचल्या होत्या. याअगोदर रविवारी पत्नी सुनीता केजरीवाल यांना भेट नाकारल्याबद्दल आम आदमी पक्षाने अनेक आरोप केले होते. त्यानंतर सोमवारी सुनीता केजरीवाल आणि दिल्लीचे पॅबिनेट मंत्री आतिशी यांनी तिहार तुऊंगात अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली. आता पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान मंगळवारी अरविंद केजरीवाल यांची भेट घेणार आहेत. तुऊंगात अरविंद केजरीवाल यांची भेट घेतल्यानंतर पॅबिनेट मंत्री आतिशी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या पुस्तकांविषयी आणि रुग्णांच्या औषध-पाण्याविषयी चर्चा केल्याचे सांगितले. मात्र, त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही भाष्य केले नाही.

Advertisement
Tags :

.