बालपण आठवणीतून गायब का आहे?
आपल्यापैकी बहुतांश लोकांना स्वत:च्या जीवनातील प्रारंभिक 3-4 वर्षांच्या अत्यंत कमी गोष्टी आठवणीत राहतात. स्वत:चा तिसरा जन्मदिन, पहिले घर किंवा त्या वयातील एखादी खास घटना न आठवणे सामान्य बाब आहे. विज्ञानात याला चाइल्डहुड एम्नेशिया म्हटले जाते. छोटी मुलेदेखील आठवणी तयार करू शकतात, परंतु मोठे झाल्यावर त्या आठवणींना आठवणे अवघड ठरते असे संशोधनातून कळले आहे.
2025 मध्ये झालेल्या एका अध्ययनात वैज्ञानिकांनी छोट्या मुलांच्या मेंदूला स्कॅन केले. यात सुमारे वयाच्या एक वर्षापासूनच हिप्पोकॅम्पसमध्ये अशा हालचाली सुरु होतात, ज्या आठवणी तयार करण्याशी निगडित असतात असे कळले. म्हणजेच छोट्या मुलांचा मेंदू आठवणी तयार करू शकतो, परंतु काळासोबत या प्रारंभिक आठवणींना परत आठवणे अवघड ठरू शकते.
संशोधनानुसार बहुतांश लोकांना 3-4 वर्षांच्या वयापूर्वीच्या अत्यंत कमी व्यक्तिगत गोष्टी आठवणीत राहतात. त्यानंतर आठवणी हळूहळू अधिक स्पष्ट होऊ लागतात, बालपणच्या प्रारंभिक आठवणी कमी राहण्याला चाइल्डहुड एम्नेशियाचा हिस्सा मानले जाते.
या वयात मुलाचा मेंदू अत्यंत वेगाने विकसित होत राहतो. हिप्पोकॅम्पस आठवणी तयार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतो. याचबरोबर मूल बोलणे, गोष्टी समजून घेणे आणि घटनांना जोडणे देखील शिकत राहत असतो. या सर्व बदलांचा प्रभाव स्मरणशक्तीवर पडतो.
वयाच्या 7 व्या वर्षापासून बदल
एका अध्ययनात वैज्ञानिकांनी 3 वर्षे वयाच्या मुलांशी त्यांच्या काही खास घटनांविषयी चर्चा केली. यानंतर जेव्हा मुलांना 5-9 वर्षांदरम्यान त्याच गोष्टी विचारण्यात आल्या, तेव्हा 5, 6 आणि 7 व्या वर्षातील 60 टक्के किंवा त्याहून अधिक घटना त्यांना आठवत होत्या, परंतु 8 आणि 9 वर्षाच्या वयात हा आकडा 40 टक्क्यांपेक्षा खाली आला. यातून बालपणीच्या आठवणी एकाचवेळी अचानक गायब हाते नसल्याचे कळते. वय वाढण्यासोबत त्यांना आठवणे हळूहळू अवघड ठरत जाते. दुसऱ्या संशोधनात छोट्या मुलांच्या प्रारंभिक आठवणी काळासोबत बदलू शकतात आणि नंतर त्यातील अनेक गोष्टी आठवणीत राहत नसल्याचे आढळून आले.
विसरतात का आठवणी?
2025 च्या संशोधनात सुमारे एक वर्षाच्या वयाच्या मुलांमध्ये हिप्पोकॅम्पसमध्ये अशा हालचाली दिसून आल्या, ज्या आठवणी तयार करण्याशी निगडित होत्या. यातून अत्यंत कमी वयातच मेंदू आठवणी निर्माण करण्याचे काम करत राहत असल्याचे कळते. परंतु बालपणात मेंदू सातत्याने बदलत राहत असतो. मुलांची भाषा, विचार अन् गोष्टी समजून घेण्याची क्षमताही वेगाने विकसित होत असते. यादरम्यान मेमरी सिस्टीममध्येही बदल होतात. याचमुळे बालपणात तयार काही आठवणींना मोठे झाल्यावर त्याचप्रकारे आठवणे सोपे राहत नाही.
बालपणीच्या सर्व आठवणी संपतात का?
काही लोकांना वयाच्या 3 वर्षांपूर्वीच्या कुठल्याही खास घटना आठवणीत राहू शकतात. परंतु अशा आठवणी सर्वसाधारणपणे अत्यंत कमी असतात. अनेकदा एखादे चित्र, जागा, आवाज किंवा परिवारात सांगण्यात आलेली गोष्ट बालपणीच्या एखाद्या जुन्या घटनेची आठवण करून देऊ शकते.
