For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जिहाद-ए-शहद का जाल !

06:18 AM Mar 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
जिहाद ए शहद का जाल
Advertisement

आंतरराष्ट्रीय स्तरांवर दुसऱ्या राष्ट्रावर मात करायची असल्यास संबंधीत राष्ट्र अनेक रणनिती आणि क्लुप्त्यांचा वापर करत असतात. अशावेळी साम-दाम-दंड-भेद या नितीचा वापर तर करण्यात येतोच, मात्र त्यातूनही हनिट्रॅपसारखे घातक शस्त्रदेखील वापरले जात असल्याचे अनेकदा समोर आले आहे. भारताला नेस्तनाबूत करण्यासाठी पाकिस्तानने अशाच प्रकारची जिहाद-ए-शहद का जाल ही मोहीम राबविण्यास सुऊवात केली आहे.

Advertisement

पाकिस्तानचे सत्ताधारी हिंदुस्थानवर मात करण्याचे स्वप्न अगदी पाकच्या जन्मापासून पाहत आहेत. मात्र ते अद्याप यशस्वी झाले नाही. 1947, 1965, 1971 आणि 1999 असे चार वेळा पाकिस्तानने हिंदुस्थानकडून सडकुन मार खाल्ला. म्हणतात ना ‘जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही’ अगदी तशी गत सध्या पाकिस्तानची आहे. पाकिस्तानात नुकत्याच सार्वत्रिक निवडणुका झाल्यात. या निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत नसल्याने, आपसुकच पाकिस्तानी लष्कराने पुन्हा एकदा पाकिस्तानच्या सत्तेवर बाहुले बसविले आहेत. जे त्यांच्या इशाऱ्यावर नाचतील. पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयचे एकच लक्ष्य आहे ते म्हणजे काही कऊन हिंदुस्थानचे तुकडे करणे. जे कधीही अस्तित्वात येणार नाही. हे त्यांनादेखील माहित आहे. कारण इतिहास ताजा आहे. त्यासाठी त्यांनी देशातील आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिस्थिती अस्थिर करण्यासाठी देशात स्लिपर सेलची पेरणी केली आहे. या स्लिपर सेलच्या माध्यमातून देशाची संवेदनशील भागाची माहिती मिळविणे, त्याठिकाणी कटकारस्थान करणे असे उद्योग त्यांनी सुऊ केले आहेत. त्यासाठी पाकिस्तानी लष्कर आणि आयएसआयने अशा संवेदनशील भागाची माहिती मिळविण्यासाठी याठिकाणी काम करणाऱ्यांना लक्ष्य करीत जिहाद-ए-शहद का जाल हे मिशन सुऊ केले. जिहाद-ए-शहद का जाल याचा अर्थ होतो हनिट्रप..

हनिट्रॅप म्हणजे मोहिनी अस्त्र. या अस्त्रात भले भले नामोहरम होतात याची कल्पना असलेल्या आयएसआयने सौंदर्याने ओतप्रोत भरलेल्या ललनांना प्रशिक्षण देऊन या मिशनमध्ये सामील करून घेतले. ज्यांचे काम संवेदनशील भागात काम करणाऱ्यांना लक्ष्य करणे, सोशल मीडियावर त्यांच्याशी ओळख वाढवून त्यांना प्रमाच्या जाळ्यात ओढणे. त्यानंतर नग्नावस्थेत व्हिडीओ कॉल कऊन त्यांच्या भावनांना वाट मोकळी करून देणे. जेणेकऊन या भावनेच्या भरात संवेदनशील माहितीचा साठा त्यांच्याकडे येईल. नेमके याच ट्रॅपमध्ये सापडला तो माझगाव डॉकचा एक कर्मचारी. कल्पेश बैकर हा. माझगाव डॉकमध्ये स्ट्रक्चरल फॅब्रीकेटर म्हणून कामाला असलेल्या कल्पेशला फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून एका तरूणीची प्रेंड रिक्वेस्ट आली. ती कल्पेशने स्विकारताच त्या तरूणीने त्याच्याशी बोलणे सुऊ केले. 2021 साली झालेल्या ओळखीने मोबाईल क्रमांक लेन-देन झाले. त्यानंतर व्हिडीओ कॉल सुऊ झाले. या दोघांमध्ये मोबाईलवऊन प्रेम निर्माण झाले. म्हणजे तसे ते कल्पेशला भासविण्याचा प्रयत्न झाला. त्यानंतर व्हिडीओ कॉल ते ही दोन्ही बाजुने नग्नावस्थेत. येथेच कल्पेशने माती खाली आणि त्याने माझगाव डॉकमधील सर्व माहिती या तरूणीला देण्यास सुऊवात झाली. येथे कोणत्या युद्धनौका बनत आहेत, कोणत्या स्वऊपाच्या पाणबुड्या आहेत. कोणती शस्त्रs बनत आहेत. याची इत्थंभूत माहिती देण्यास सुऊवात केली. युद्धनौका आणि पाणबुड्या यांच्या 25 आरेखनांची माहिती त्याने या तरूणीला दिल्याचे आत्तापर्यंत समोर आले आहे. केवळ या तरूणीने टाकलेल्या मोहजालात अडकलेल्या कल्पेशला आपण देशाबरोबर गद्दारी करतोय याचे जरा देखील भान नव्हते. मात्र वेळीच हा प्रकार राज्य एटीएसच्या लक्षात आला आणि त्यांनी कल्पेशला अटक केली. त्यावेळेस हे सत्य बाहेर आले. कल्पेश हा काही पहिला तरूण नाही जो हनिट्रॅपमध्ये अडकला. यापूर्वी देखील पाकिस्तानी आयएसआयने ललनांचा वापर करीत अशा प्रकारे जिहाद-ए-शहद का जाल घडवून आणले आहेत.

Advertisement

गेल्या वर्षी देशाच्या डीआरडीओ संस्थेत काम करणारे शास्त्रज्ञ पाकिस्तानी ललनाच्या संपर्कात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली. डॉ. प्रदीप कुऊलकर असे या शास्त्रज्ञाचे नाव समोर आले. एकेकाळी हे शास्त्रज्ञ अतिशय शिस्तप्रिय आणि देशभक्त असल्याची अनेक उदाहरणे आहेत. अचानक हे शास्त्रज्ञ देशद्रोही नेमके झाले कसे? हा प्रश्न अनेकांना पडला. तर या ठिकाणी देखील कुऊलकर हे जिहाद-ए-शहद का जालला बळी पडले. कुऊलकर यांचे सोशल मीडियावर अनेक लेख आणि पोस्ट असत. नेमके याच पोस्ट आणि लेख वाचून आपण प्रभावित झाल्याचे मेसेज कुऊलकर यांना येण्यास सुऊवात झाली. हे सर्व मेसेज एका महिलेच्या सोशल मीडियाच्या खात्यावऊन येत होते. प्रथम दुर्लक्ष केल्यानंतर कुऊलकर यांची नस या महिलेच्या लक्षात आली आणि तिने शेवटचा

बॉम्ब टाकला. तो म्हणजे मला भारत देशाबद्दल प्रेम वाटते.

देशा संदर्भात अशाच प्रकारची पोस्ट आणि लेख पाठवित जा, हे सर्व लेख मी पाकिस्तानात अनेक हिंदु तसेच भारत देशाबद्दल प्रेम असणाऱ्यांना पाठवित जाईन. बस्स आपले कौतुक होत आहे, असे समजताच कुऊलकर यांनी प्रथम या मेसेजला उत्तर दिले. येथूनच सुऊ झाला तो हनिट्रॅपचा खेळ. ऐकमेकांचे फोन नंबर घेतल्यानंतर हे कॉल कधी व्हिडीओ कॉलवर वळले तेच समजले नाही. तेही अश्लिल व्हिडीओ कॉल सुऊ झाल्यानंतर कुऊलकर यांनी अतिसंवेदनशील माहिती या ललनेला पुरविण्यास सुऊवात झाली. तर नेमका याचा संशय रॉ ला आला. यावेळी त्यांनी तत्काळ डीआरडीओला कळविले. डीआरडीओच्या वरिष्ठानी कुऊलकर यांचा लॅपटाप जप्त केला. यावेळी त्यांनी अतिशय गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानी ललनेला पुरविल्याचे समोर आले. डीआरडीओने तत्काळ कुऊलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केल्यानंतर तपासाअंती राज्य एटीएसने त्यांना अटक केली.

पाकिस्तानी आयएसआयने अशा प्रकारे हनिट्रॅपचा उपयोग केवळ पुऊषावरच नाही तर महिला अधिकाऱ्यावर देखील केला आहे. सुंदर पुऊषांच्या मदतीने हनिटॅप केला असल्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे, माधुरी गुप्ता. पाकिस्तानी राजदुतालयात डिप्लोमॅट म्हणून नेमणूक झाल्यानंतर त्या येथे बऱ्यापैकी रमल्या होत्या. माधुरी गुप्ता ही अतिशय हुशार अधिकारी होती. तिने यापूर्वी अनेक देशात डिप्लोमॅट म्हणून काम केले होते. उर्दु भाषेवर तिचे प्रभुत्व असल्याने, तिची पाकिस्तानात रवानगी करण्यात आली होती. सर्व काही व्यवस्थित सुऊ असतानाच अचानक अविवाहीत असलेल्या माधुरी गुप्ता यांच्या संपर्कात पाकिस्तानी तरूण आला. वयाने तरूण आणि उर्दु शायरीत तरबेज असलेल्या या तरूणाने आपल्यापेक्षा वयाने दुप्पट असलेल्या माधुरीला प्रेमाच्या जाळ्यात अडकविले.

यावेळी माधुरी या तरूणाच्या प्रेमात एवढी वाहवत गेली की आपण देशाबरोबर देशद्रोह करीत असल्याचे देखील समजले नाही. भावनेच्या भरात तिने संवेदनशील माहिती या तरूणाला देण्यास सुऊवात केली. मात्र याची चाहुल रॉ ला लागली. यावेळी माधुरी गुप्ता हिला देशात बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर चौकशी सुऊ करीत निलंबित केले. तर काही दिवसातच तिचा मृत्यू झाला. मात्र एवढे होऊन देखील पाकिस्तानचे जिहाद-ए-शहद का जाल हे ऑपरेशन अद्यापही सुऊ आहे.

                                        - अमोल राऊत

Advertisement
Tags :

.