कोरियन लोकांना का नसते दाढी, मिशी?
यामागे आहे अनोखे कारण
भारतात दाढी अन् मिशीची सर्वाधिक क्रेझ दिसून येते. परंतु इंटरनेटवर किंवा चित्रपटांचे चाहते असाल तर कोरियन युवकांना दाढी अन् मिशी येत नसल्याचे पाहिले असेल. कोरियन युवकांना दाढी अन् मिशी का नसते याचे उत्तर अत्यंत अनोखे आहे.
भारतात दाढी न् मिशी राखण्याचा प्रकार अधिक असतो. परंतु जगभरात असे अनेक देश आहेत, जेथे युवकांना दाढी अन् मिशी येत नाही. यात कोरियाचे युवक देखील सामील आहेत. कोरियन युवकांना दाढी येते, परंतु त्यांच्या केसांची वाढ जगातील अन्य देशांपेक्षा खूपच मंदगतीने होते. यामागे अनेक प्रकारची कारणे आहेत.
कोरियन लोकांच्या चेहऱ्यात ईडीएआर जीनमुळे कमी केस उगवतात. यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर खूपच कमी केस असतात आणि हीच आनुवांशिकता नव्या पिढींमध्ये हस्तांतरित होते. टेस्टोस्टेरोन हार्मोन चेहरा आणि दाढीच्या केसांच्या विकासासाठी जबाबदार आहे. 19-38 वयाच्या युवकांमध्ये टेस्टोस्टेरोनची पातळी 264-916 नॅनोग्रॅम प्रति डेसीलिटरदरम्यान असायला हवे. यात अनिश्चिततेमुळे पूर्व आशियाच्या लोकांमध्ये केसांचे प्रमाण कमी असते.
कोरियाच्या संस्कृतीमध्ये कमी दाढी असलेल्या पुरुषांना अधिक महत्त्व दिले जाते. कोरियात दाढी राखणे अस्वच्छता, अशुद्ध आणि आळशीपणा म्हणून पाहिले जाते. याचमुळे येथील लोक दाढी न राखणे पसंत करतात. तसेच सुंदरता डोळ्यांमध्ये असते असे येथील लोकांचे मानणे आहे. याचमुळे हे लोक दाढी न राखण्याचा निर्णय घेत असतात.