घड्याळाच्या जाहिरातींमध्ये ‘10:10’च का दाखवितात?
कारण कळल्यास व्हाल अवाक्
तुम्ही कधी घड्याळ, स्मार्टवॉच किंवा वॉलक्लॉकची जाहिरात काळजीपूर्वक पाहिली असल्यास एक गोष्ट तुमचे लक्ष वेधून घेते. बहुतांश जाहिरातींमध्ये वेळ 10 वाजून 10 मिनिटेच (10:10) दाखविण्यात येते. हा काही योगायोग नाही, तर दशकांपूर्वीच्या जुन्या मार्केटिंग रणनीतिचा हिस्सा आहे. अलिकडेच या विषयावर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. प्रत्यक्षात बहुतांश घड्याळ कंपन्या आजही स्वत:च्या जाहिरातींमध्ये 10:10 ची वेळच दाखवितात. यामागे केवळ डिझाइन नव्हे तर मनोविज्ञान आणि ब्रँडिंग देखील काम करते.
10:10 च का?
10: 10 वर घड्याळाचे दोन्ही काटे इंग्रजीच्या ‘व्ही’ अक्षरासारखी आकृती तयार करतात. यामुळे डायल संतुलित, साफ आणि आकर्षक दिसून येते. काटे एकमेकांना झाकोळत नाहीत, यामुळे पूर्ण घड्याळ सहजपणे दिसून येते.
ब्रँडचा लोगो स्पष्ट दिसतो
बहुतांश घड्याळ कंपन्या स्वत:चा लोगो 12 वाजण्याच्या ठीक खाली लावतात, 10: 10 वर काटे त्या हिस्स्याला झाकोळत नाहीत, तर लोकांना फ्रेम करताना दिसून येतात, याचबरोबर डेट विंडो, क्रोनोग्राफ आणि इतर छोटे डायलही स्पष्टपणे दिसून येते. घड्याळ उद्योगाचे तज्ञही 10:10 ला केवळ एक योगायोग मानत नाहीत.
10:10 वर घड्याळाचे काटे ब्रँडच्या लोगोला दोन्हीबाजूने फ्रेम करतात, ज्यामुळे डायल अधिक आकर्षक दिसून येते असे लक्झरी वॉच रिटेलर टूरनोचे माजी कार्यकारी उपाध्यक्ष एंड्य्रू ब्लॉक यांचे सांगणे आहे. 10:10 ची पोझिशन पाहिल्यावर डायल हसऱ्या चेहऱ्यासारखा आभास होतो, जो ग्राहकांवर सकारात्मक मनोवैज्ञानिक प्रभाव पाडतो. याचमुळे जगातील बहुतांश घड्याळ कंपन्या स्वत:च्या जाहिरातींमध्ये 10:10 ची वेळ दाखविणे पसंत करतात असे स्वीच वॉच कंपनी यूलिस नार्डिनच्या माजी विपणन प्रमुख सुजैन हर्नी यांचे सांगणे आहे.
हसऱ्या चेहऱ्यासारखी डायल
10:10 वर काट्यांची आकृती अनेक लोकांना हसऱ्या चेहऱ्यासारखी जाणवते. यामुळे घड्याळ पाहणाऱ्यांच्या मनात सकारात्मक प्रभाव पडतो असे मार्केटिंग तज्ञांचे सांगणे आहे.
पूर्वी 8:20 वेळ दाखविली जायची
सध्या 10:10 सर्वात लोकप्रिय वेळ आहे, परंतु प्रारंभिक काळात काही कंपन्या 8.20 देखील दाखवत होत्या. नंतर 10:10 अधिक प्रचलित झाले, कारण डायल यामुळे अधिक खुली अन् संतुलित दिसते.
सर्व कंपन्या करतात का अनुकरण?
बहुतांश कंपन्या 10:10 किंवा त्याच्या आसपासची वेळ निवडतात, परंतु काही ब्रँड यात काहीसा बदल देखील करतात. उदाहरणार्थ अॅपल वॉचच्या प्रचारात अनेकदा 10:09 ची वेळ दाखविली जाते. हे देखील डिझाइन आणि समरुपतेसाठी आकर्षक करण्यासाठी केले जाते, असे तज्ञांचे मानणे आहे, परंतु अॅपलने याचे कुठलेच अधिकृत कारण सांगितलेले नाही.
कधीपासून परंपरा
घड्याळ उद्योगात 10:10 चा वापर अनेक दशकांपासून होत आला आहे. काळासोबत हे एक प्रकारचे इंडस्ट्री स्टँडर्ड ठरले आहे. आता मॅगजीन, ऑनलाइन शॉपिंग वेबसाइट, होर्डिंग आणि स्टोअर डिस्प्लेमध्ये दिसून येणारी बहुतांश घड्याळ याच वेळेवर सेट असतात. 10:10 हे कुठल्याही उत्पादनाच्या छायाचित्रात छोट्यातील छोटी गोष्टही किती विचारपूर्वक निश्चित केली जाते हे दाखवून देते. काट्यांची एक छोटी पोझिशन घड्याळाला अधिक आकर्षक, संतुलित आणि प्रीमियम दाखवू शकते. याचमुळे जेव्हा कुठल्याही घड्याळाच्या जाहिरातीत 10:10 ची वेळ दिसली तर तो योगायोग नव्हे तर एक विचारपूर्वक राबविलेली मार्केटिंग रणनीति असल्याचे लक्षात ठेवा.