फसगत करून माझा बळी का घेतला : वसंतराव मुळीक
कोल्हापूर :
सामान्य कार्यकर्त्यांच्या सन्मानासाठी मधुरिमाराजे यांची उमेदवारी अर्ज माघार घेतल्याचे खासदार शाहू छत्रपती यांनी म्हटले आहे. मी सुद्धा सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. मधुरिमाराजे यांची माघारी घेणार होता तर मला उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास का लावले. फसगत करून माझा बळी का घेतला, असा सवाल अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे.
मुळीक म्हणाले, आमदार व्हावे अशी अपेक्षा इच्छा नव्हती. परंतू लोकांनीच अग्रह धरल्याने उमेदवारी अर्ज भरला. परंतू खासदार शाहू छत्रपती यांनी घरी येऊन माघार घेण्यास सांगितले. त्यांच्या शब्दामुळे उमेदवारी अर्ज माघार घेतला. यानंतर मधुरिमाराजे यांचाच अर्ज माघार घेण्यात आला. यावर माझ्या कुटुंबाला, कार्यकर्त्यांना प्रचंड मनस्ताप झाला. माझ्यावर अन्याय करणारी ही घटना आहे. लाटकर प्रमाणे मी सुद्धा सामान्य कार्यकर्ता असूनही मला बळीचा बकरा केला, ही समाजाची भावना चूकीची आहे काय? माझी फसगत झाली असून यास जबाबदार कोण आहे याचे उत्तर द्यावे लागेल, असेही मुळीक यांनी म्हटले आहे. दोन दिवसांत कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन विधानसभा निवडणूकीबाबत पुढील भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. शंकरराव शेळके, प्रकाश पाटील, विजय पाटील, शैलजा भोसले, संयोगीता देसाई, किशोर डवंग, मनोज नरके, प्रणव डाफळे, अवधुत पाटील उपस्थित होते.