'मंत्रीपदाचा एवढा गोडवा धनंजय मुंडेंना का आहे' संभाजीराजे छत्रपती
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मीक कराडला प्रोटेक्शन देत आहे, संभाजीराजे यांचे आरोप
कोल्हापूर
मी अजून सीसीटीव्ही पाहिलेले नाही मात्र माझ्या कानावर आलेला आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून या मर्डरचं कनेक्शनच चित्र बऱ्यापैकी स्पष्ट होते आहे. म्हणूनच आमची सरकारला ही मागणी आहे, मोकाच्या अंतर्गत जो गुन्हा दाखल केला त्यापेक्षा जास्त ३०२ हत्येचा माध्यमातून गुन्हा नोंद करण्यात यावा, याशिवाय पर्याय नाही. तसेच धनंजय मुंडे मंत्री राहणं देखील बरोबर नाही या सर्व गोष्टी टप्प्याटप्प्याने समोर येणार आहेत. धनंजय मुंडे फार मोठ मोठ बोलतात मात्र त्यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा द्यायला हवा. मंत्रीपदाचा एवढा गोडवा धनंजय मुंडेंना का आहे, हे कळत नाही. नैतिक जबाबदारी म्हणून त्यांनी राजीनामा द्यावा आणि सांगावं की वाल्मीक कराडाचा माझ्याशी संबंध आहे. जग जाहीर आहे. वाल्मिक कराड यांनी आपलं वटमुकत्यार पत्र धनंजय मुंडे यांना दिला आहे यापेक्षा आणखी काय हव?राज्यातच नव्हे तर देशात चर्चा सुरू आहे तरी देखील तुम्हाला मंत्रीपदाच्या खुर्चीवर बसायचा आहे. माझं मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना प्रश्न आहे जर मुंडे क्लिअर असल्याचे तर त्यांना पालकमंत्रीची जबाबदारी दिली असती. ते दोषी आहेत म्हणूनच त्यांना पालकमंत्री पद दिलेला नाही. अजूनही मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री नकळत वाल्मीक कराडला प्रोटेक्शन देत आहेत. तुम्ही अजून ही वाल्मीक कराड वर गुन्हाही नोंद करत नाही. सरकारने लवकरात लवकर पारदर्शीपणे खुनाचा गुन्हा दाखल करून धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना केली.
पुढे ते म्हणाले, धनंजय मुंडे यांचे नाव घ्यायला सर्वजण सुरुवातीला घाबरत होते. मात्र मी सुरुवातीला मुंडेनी राजीनामा द्यावा मागणी केली होती. आता सर्व समोर येत आहे, यामुळे मी केलेल्या मागणी खरी होती आहे. त्यांना पालकमंत्री पद दिले नाही याचा मला आनंद आहे. अजित पवार यांच्या मागे धनंजय मुंडे पालकमंत्री पद सांभाळणार का हे येत्या काळातच पाहुयात, त्यांचं पालकमंत्री पदासाठी इंटरेस्ट आहेच, म्हणून त्यांनी मंत्रिपद सोडलेला नाही. अन्यायाच्या विरोधात न्याय साठी लढा देण्याचे जबाबदारी माझी असते. त्यांना किती भांडायचं भांडू दे. मात्र यामुळे वातावरण गढूळ होत आहे.
याप्रसंगी जरांगे पाटील यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, ते वेगवेगळ्या पद्धतीने लढा उभा करतात. त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत.
गडकिल्ल्या अतिक्रमण या प्रश्नी संभाजीराजे यांना विचारणा झाली असता ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे किल्ले हे आपले जीवन स्मारक आहेत. या गडकोट किल्ल्यांमुळेच हिंदवी स्वराज्याची स्थापन झाले आहे. म्हणून सरकारने घेतलेल्या निर्णय स्वागत करतो. मात्र सरकारने खबरदारी घेणं आहे आवश्यक आहे. विशाळगडचा अतिक्रमण काढायला मी गेलो तेव्हा माझा कोणताही हस्तक्षेप नसताना आणि कायदा हातात न घेता, तेथे अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे वातावरण गढूळ झाले. दोन धर्मांमध्ये तिढा निर्माण झाला, ते होऊ नये याची सरकारने काळजी घ्यायला हवी. गडावर व्यावसायिक अतिक्रमण राहता कामा नये हे माझं स्पष्ट मत आहे. मात्र विशाळगडला जे काही झालं ते पुन्हा कुठे होऊ नये याची सरकारने काळजी घ्यायला हवी, असेही संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.