महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कोणाचे सरकार बनणार?

06:48 AM Dec 03, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा विधानसभा निवडणुकीचा आज निकाल : मिझोरामची मतमोजणी लांबणीवर

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

नुकत्याच विधानसभा निवडणूक पार पडलेल्या राज्यांमध्ये आता ‘कोणाचे सरकार बनणार?’ याची उत्सुकता देशवासियांना लागली आहे. मध्यप्रदेश, राजस्थान, तेलंगणा आणि छत्तीसगड या चार राज्यांमध्ये आज, रविवारी मतमोजणी होणार आहे. तर, मिझोरामचे निकाल सोमवार, 4 डिसेंबरला जाहीर होतील. एक्झिट पोलच्या आकडेवारीत उलट-सुलट अंदाज वर्तविण्यात आल्याने विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी रंजक वातावरण निर्माण केले आहे. तरीही बहुतांश राज्यांमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन राष्ट्रीय पक्षांमध्ये चुरस असल्याचे चित्र दिसून येत आहे.

चार राज्यांमधील मतमोजणीला रविवारी सकाळी 8 वाजता प्रारंभ होईल. सुरुवातीला पोस्टल मतांची मोजणी झाल्यानंतर ईव्हीएममधील मतमोजणी सुरू केली जाईल. सुरुवातीला दीड-दोन तास पोस्टल मतमोजणी झाल्यानंतर विविध राज्यांमधील कल स्पष्ट होऊ लागतील. साधारणपणे दुपारी 12 वाजेपर्यंत प्राथमिक स्वरुपातील कल समजतील. त्यानंतर सायंकाळपर्यंत मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निवडणूक आयोगाकडून रात्रीपर्यंत अधिकृत निकाल जाहीर होणार आहे.

देशातील पाच राज्यांमधील निवडणूक कार्यक्रम 7 नोव्हेंबरपासून सुरू होऊन 30 नोव्हेंबरला संपला. सर्वप्रथम, मिझोराम आणि छत्तीसगडमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान 7 नोव्हेंबर रोजी झाले आणि त्यानंतर मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये 17 नोव्हेंबर रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले. यानंतर 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानच्या 199 विधानसभा जागांवर मतदान झाले आणि अखेर 30 नोव्हेंबर रोजी तेलंगणाच्या 119 विधानसभा जागांवर मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर वेगवेगळ्या वाहिन्यांनी एक्झिट पोलही प्रसिद्ध केले. वृत्तवाहिन्या आणि संस्थांनी दाखविलेल्या एक्झिट पोल अंदाजानुसार क्लीन स्वीप करण्याच्या काँग्रेसच्या आशांना मोठा धक्का बसू शकतो, असे ताज्या गणितावरून दिसून येत आहे. राजस्थान आणि मध्यप्रदेश या हिंदी भाषिक राज्यांमध्ये काँग्रेसची पिछेहाट होऊ शकते, असे बहुतांश सर्वेक्षणातून दिसून आले आहे. सध्या काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या छत्तीसगडमध्येही भाजपच्या वर्चस्वामुळे काँग्रेससमोर कडवे आव्हान उभे राहू शकते.

मध्यप्रदेश-राजस्थानमध्ये टक्कर

17 वर्षांपासून सत्तेत असलेल्या मध्यप्रदेशात भाजप अडचणीत सापडला आहे. मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांचे रेकॉर्ड खराब असल्याचे बोलले जात आहे. 2018 च्या निवडणुकीत चौहान काँग्रेसच्या कमलनाथ यांच्याकडून पराभूत झाले होते. तरीही ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या आमदारांच्या गटामुळे चौहान मुख्यमंत्रीपदावर कायम राहिले आहेत. त्यांनी 2019 मध्ये कमलनाथ सरकार पाडल्यानंतर काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला होता. पक्षांतरामुळे चौहान यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सरकार स्थापन करण्यासाठी आवश्यक असलेल्या अतिरिक्त जागा भाजपला मिळाल्या. शेजारच्या राजस्थान राज्यात भाजप दीर्घकाळ नेतृत्वहीन असून गटबाजीने ग्रासलेला आहे. अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुन्हा सत्तेत येण्यासाठी सज्ज दिसत आहे. मात्र, दर पाच वर्षांनी सत्तापालट होण्याचा सिलसिला कायम राहिल्यास येथे सत्तांतर होऊ शकते.

तेलंगणा-छत्तीसगडची उत्सुकता

दक्षिणेकडील राज्य तेलंगणातील मतदारांचा कौलही महत्त्वाचा ठरणार आहे. एक्झिट पोल अंदाजानुसार, केसीआर यांच्या भारत राष्ट्र समितीशी (बीआरएस) काँग्रेस कडवी झुंज देणार असल्याची अपेक्षा आहे. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागा आहेत. एक्झिट पोल अंदाजांमध्ये येथे काँग्रेसला आघाडी मिळाली असली तरी, भाजपला मिळालेल्या जागांशी तुलना केल्यास ही लढत एकतर्फी मानता येणार नाही. काँग्रेसने मिळवलेल्या जागांच्या तुलनेत भाजपही मागे नाही. या दोघांमध्ये निकराची स्पर्धा असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. राज्यात भूपेश बघेल सरकारच्या विरोधात सत्ताविरोधी लाट नसल्याचे सर्वेक्षणात म्हटले आहे. सर्वेक्षणात 31 टक्के लोकांनी विद्यमान मुख्यमंत्री भूपेश बघेल यांना आपली पसंती असल्याचे घोषित केले आहे. त्याचवेळी राज्याचे माजी मुख्यमंत्री रमणसिंह यांना केवळ 21 टक्के मते मिळाली. अॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा एकदा सरकार स्थापन करणार असल्याचे दिसत आहे. येथे काँग्रेसला 40 ते 50 जागा मिळतील असे म्हटले आहे. त्याचवेळी भाजपला 36 ते 46 जागा देण्यात आल्या आहेत.

विधानसभा निवडणूक दृष्टिक्षेप...

राज्य    एकूण जागा      बहुमत  रिंगणातील उमेदवार

मध्यप्रदेश        230               116      2,533

राजस्थान        199               100      1,863

तेलंगणा          119               60       2,290

छत्तीसगड        90                 46       1,355

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article