महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सावंतवाडी मतदारसंघ शरदचंद्र पवार राष्ट्रवादीला सोडणार ?

11:53 AM Oct 18, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

राजन तेलींची मविआतील एन्ट्री धुसफूस वाढविणार ?

Advertisement

सावंतवाडी | प्रतिनिधी 

Advertisement

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात  महायुतीचा फॉर्म्युला निश्चित केला आहे . महायुतीमध्ये दोन जागा भाजपला व एक जागा शिवसेनेला तर महाविकास आघाडीमध्ये दोन जागा शिवसेनेला एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला असे निश्चित झाले आहे. महाविकास आघाडीने सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार.पक्षाला सोडल्याची घोषणा खुद्द दोन दिवसांपूर्वीच एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सौ अर्चना घारे परब यांचे तिकीट जवळपास निश्चित मानले जात आहे.. तर महायुतीमधून कुडाळ विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी खासदार निलेश राणे यांचेही नाव निश्चित झाले आहे..महाविकास आघाडी मधून सावंतवाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सौ. अर्चना घारे परब., कुडाळ विधानसभा मतदारसंघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे विद्यमान आमदार वैभव नाईक.,कणकवली विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतून शिवसेना पक्षाला अद्याप कोणाला उमेदवारी द्यायची हे निश्चित झाले नसले तरी सुशांत नाईक ,संदेश पारकर ,सतीश सावंत हे तिघेजण इच्छुक आहेत. मात्र संदेश पारकर यांच्या नावाला पक्षश्रेष्ठींकडून सहमती मिळत आहे. महायुती मधून सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचे विद्यमान आमदार ,राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर. कणकवली विधानसभा मतदारसंघात भाजपचे विद्यमान आमदार नितेश राणे अशी नावे जवळपास निश्चित झाली आहेत. एकंदरीत राजकीय घडामोडींना आता वेग आला असून भाजपचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख राजन तेली यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिल्याने आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये उभी फूट पडणार आहे. श्री तेली हे भाजपला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मातोश्रीवर सायंकाळी चार वाजता मशाल हाती घेणार आहेत. हे जवळपास निश्चित झाले आहे. मात्र सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात श्री तेली यांच्या महाविकास आघाडीतील इंट्रीमुळे आता सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाच्या जागे संदर्भात पुन्हा एकदा वाटाघाटी सुरू होणार आहेत. श्री तेली हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेणार आहेत असे समजते. मात्र या भेटीत श्री पवार नेमकी काय भूमिका घेतात की सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ हा जाहीर केल्याप्रमाणे कायम ठेवतात याकडे आता लक्ष लागून आहे . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संभाव्य उमेदवार सौ अर्चना घारे परब यांना तातडीने मुंबईमध्ये पाचारण करण्यात आले आहे.आठ वर्ष. सौ घारे परब मतदार संघात जनतेच्या संपर्कात आहेत . गतवेळी त्यांना एबी फॉर्म मिळूनही अचानक एबी फॉर्म बदलण्यात आला. आता दुसऱ्यांदा त्या पूर्ण ताकदीनिशी कामाला लागल्या आहेत. असे असताना श्री तेली यांच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्ष प्रवेशाच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय गणिते आता बदलणार आहेत. राजन तेलींना मातोश्रीवरून कोणता संकेत मिळतो हे आता लवकरच स्पष्ट होणार आहे.

Advertisement
Tags :
# tarun bharat news # konkan update # sawantwadi # ncp #
Next Article