बँक खात्यातून तब्बल 5 लाख 86 हजार ऑनलाईन गायब
रत्नागिरीतील बँक ऑफ इंडियाच्या खात्यावर अवघ्या तासाभरातील डल्ला
त. भा. प्रतिनिधी
रत्नागिरी :
रत्नागिरी शहर आणि परिसरात सायबर गुन्हेगारांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. ऑनलाईन फसवणुकीच्या एका मोठ्या घटनेत, अज्ञात भामट्याने बँक खातेदाराच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून तब्बल 5 लाख 86 हजार 9 ऊपये परस्पर ऑनलाईन काढून घेऊन मोठी फसवणूक केली आहे. या धक्कादायक प्रकारामुळे व्यापारी आणि नागरिक वर्गात चिंतेचे वातावरण पसरले असून रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही फसवणुकीची घटना 25 जुलै 2026 रोजी सायंकाळी 6:36 ते 7:37 वाजण्याच्या अवघ्या एका तासाच्या कालावधीत घडली. फिर्यादी राजेश रमेश सोहनी (व्यवसाय: कर सल्लागार, रा. आश्रय, शांतीनगर, नाचणे, रत्नागिरी) यांचे मित्र धीरज अर्जुन भानुशाली (रा. शांतीनगर, नाचणे) यांचे बँक ऑफ इंडियाच्या माऊती मंदिर शाखेत बचत खाते (सेव्हिंग अकाऊंट) आहे. 25 जुलैच्या सायंकाळी अज्ञात इसमाने कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय किंवा संमतीशिवाय या खात्यामधून ऑनलाईन पद्धतीने 5,86,009/- ऊपये परस्पर वर्ग करून घेतले.
सायबर पोर्टलवर तक्रारीनंतर पोलिसांत गुन्हा नोंद
आपल्या बँक खात्यातून एवढी मोठी रक्कम अनधिकृतपणे गायब झाल्याचे लक्षात येताच, पीडित भानुशाली आणि त्यांचे मित्र राजेश सोहनी यांनी सुऊवातीला सायबर पोर्टलवर ऑनलाईन तक्रार नोंदवली. त्यानंतर 31 जुलै 2026 रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष हजर राहून अधिकृत तक्रार दाखल केली.
राजेश सोहनी यांच्या फिर्यादीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी अज्ञात आरोपीविऊद्ध गुन्हा नोंद क्रमांक 254/2026 दाखल केला आहे. यामध्ये नवीन ङङभारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 318(4), माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 चे कलम 66 तसेच भारतीय दंड विधान कलम 420 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर ऑनलाईन व्यवहार करण्रायांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. पोलीस या प्रकरणातील बँक खात्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स आणि आयपी अॅड्रेस ट्रेस करून अज्ञात सायबर भामट्याचा शोध घेत आहेत.
नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लिंकवर क्लिक करू नये, बँक खात्याशी संबंधित गोपनीय माहिती किंवा ओटीपी कोणाशीही शेअर करू नये. ऑनलाईन आर्थिक फसवणूक झाल्यास त्वरित 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.